मराठी माणसांची अस्मिता असलेला शिवसेना पक्ष फोडून, चिन्ह देखील हिरावून भाजपने कसा विश्वासघात केला हे जगजाहिर आहे, पण हे करत असताना दुसरा ठाकरेही आपल्याला मुंबईत ताकतवान नको तरच महाराष्ट्र तोडता येईल याची काळजी घेतली. राज ठाकरेंचा उध्दव ठाकरे द्वेष अचूक हेरला आणि दोघांत भांडण कशी वाढतील यावर भर दिला. सत्तेत सहभागी करू, युती करु, या आश्वासनावर ठेवुन राज ठाकरेंना इडीचा दबाव टाकून झेंड्याचा रंग बदलायला लावला आणि हिंदुत्वाची भूमीका घ्यायला भाग पाडल, जिथे झेंड्याचा सर्व धर्मीय रंग बदलाला तिथेच मतात घट करण्याचा पहिला डाव भाजपने टाकला,
नंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना अडचण निर्माण व्हावी म्हणून भोंग्याचा विषय घ्यायला सांगितलं त्याचा परिणाम असा झाला राज ठाकरेंची मुस्लीम मतही दूरावली, नंतर शिंदे फडणवीसांनी सत्ता स्थापन केल्यानंतर ते राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरेंना मंत्री पद देवू वैगेरे स्वप्न दाखवली आणि लोकसभेला बिनशर्त पाठिंबा पदरात पाडून घैतला. नंतर आली विधानसभा तिथेही स्वताचा फायदा बघत मनसेने भाजप समोर मुंबईत उमेदवार दिले नाही एवढच नाही तर शिंदेनाही मनसेने समर्थन दिल पण त्या बदल्यात राज ठाकरेंच्या मुलाविरोधातच युतीने उमेदवार दिला. आपण फसलो आहोत हे राज ठाकरेंना कळायला हव होत पण भाजपच्या नादाला इतके लागले होते की त्यांनी थेट उध्दव ठाकरेंवर गद्दारीचा आरोप केला, " फडणवीसांना मुख्यमंत्री बनवायच, एखादा उद्योग महाराष्ट्रा बाहेर गेल्याने फरक पडत नाही", अशी विधाने करत ठाकरे आणि पवारांवार टोकाची टिका करून राज ठाकरेंनी आपली उरले सुरलेली मतही गमावली आज पुरेशी मत न मिळाल्याने त्यांच पक्ष आणि चिन्ह धोक्यात आल आहे.थोडक्यात मुंबई महाराष्ट्र पासून तोडायची असेल, वेगळा विदर्भ राज्य स्थापन करायच असेल तर ठाकरे संपायला हवे यासाठीच भाजपने चालवलेल हे राजकारण होत त्याला त्यांनी "हिंदुत्व" हे गोंडस नाव दिल. अनेक उद्योग गुजरातला आधीच गेले आहेत, निवडणूका जिंकण्यासाठी विविध योजनांचा ताण महाराष्ट्रावर आधीच टाकला आहे. याने महाराष्ट्राचे खच्चीकरण होऊन कमजोर होणार. नंतर त्याचे दोन चार तुकडे पडणार पण आम्ही मात्र "हिंदुत्व खतरे मे" या घोषणेखाली टाळ्या वाजवणार!! मराठी माणसाने स्वताच मोठ नूकसान करुन घेतल आहे हे जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघुन गेलेली असेल!!
................. काल काही गद्दारी करणारे नाचत होते गुलाल उधळत होते, मोदी शहा यांचे गुणगान गात होते, आणि गुजराती मारवाडी हिंदी भाषीक पेढे वाटत होते, रेल्वे मधे गुजराती. गाणी बोलून मोदी आवेछे मुंबई ना राज करे छे , हर हर मोदी घर घर मोदी ,त्यात महिला पण टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होत्या, त्यांना हिंदी भाषीक साथ देत होते आणि आजूबाजूला बसलेले मराठी फक्त खाली मान घालून बसले होते त्यांचा येवढा तमाशा सुरू होता ते बघून काही मराठी तरूणांना राग येत होता पण ते हतबल झाले होते कारण आपण लाचार झालो आहोत हे त्यांना समजले होते , हिंदू जननायक राज ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज हरले आहेत कारण ह्या दोन भावांचे आणि मराठी माणसांचे अस्तित्व मोदी शहा यांनी संपविले आहे हे आज नाही कळणार पण हळूहळू हे सर्व मुंबई आणि महाराष्ट्र आपल्या कडे ओढून घेतली तेव्हा फक्तं बघत रहावे लागणार, विचार करा गुजराती लोक जल्लोष का करत आहेत, गुजरात मधे किंवा इतर राज्यात भाजप जिंकले तर मराठी जणता जल्लोष करते का,मग महाराष्ट्र मधे गुजराती मारवाडी हिंदी भाषीक येवढा जल्लोष का करत आहेत कारण तुमची दादागिरी त्यांनी संपवली आहे, आपल्याला मुस्लिम समाजाच्या लोकांची भिती दाखवून सत्ता हस्तगत केली पण मुस्लिम लोकांना काही फरक पडत नाही सत्ता कोणाची ही येऊ दे ते आपले काम करणार,फरक पडणार तो आपल्याला जी मान ताठ करून बोलायची सवय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवली होती ती मान एखाद्या गुजराती शेठ कडे किंवा परप्रांतीय मालका कडे समोर उभे राहुन ताठ मानेने बोलू शकणार नाही.दारूच्या बाटलीत विकलेले कधी कोणाचे होणार नाहीत त्यांना मराठी बाणा स्वाभिमान याचा फरक पडत नाही.
अरुणा नारायण
0 टिप्पण्या