Top Post Ad

संभाजी ब्रिगेड पक्षाचे मुंबईसह राज्यभर २६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

शिक्षणसता, धर्मसता, प्रचार प्रसार सत्ता व अर्थसता या सत्ता ताब्यात घ्यायच्या असतील तर प्रथम राजसता हातात घावी लागेल. संसदेत छत्रपती शिवराय, ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची यांच्या कार्याची जाणीव असलेली लोकं असणं गरजेचे आहे, देशातील तसेच जगातील प्रत्येक प्रश्नांची जाणीव असलेले, इतिहास माहित असलेले, त्या प्रश्नांची उत्तरं व समाधान माहिती असलेले अभ्यासक, संशोधक, विशेषज्ञ संसदेत असणं गरजेचे आहे, जिजाऊ कृपेर्ने मागील ३० वर्षात संभाजी ब्रिगेड ने हे असे अनेक संशोधक, विशेषज्ञ, अभ्यासक तयार केलेले आहेत. संभाजी ब्रिगेड पक्षा ने १७६ वांद्रे पूर्व विधानसभा गणपत शंकर गावकर आणि १५३ दहिसर विधानसभा अशोक श्यामशरण गुप्ता असे मुंबईसह राज्यभर २६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले असल्याचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सुहास राणे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले. यावेळी प्रवक्ता- प्रमोद शिंदे,  सचिव- गणपत गावकर, उपाध्यक्ष- निशा शेख,  संघटक- सुदाम साहोल,  कामगार आघाडी अध्यक्ष- राजेंद्र कांबळे, महिला आघाडी सचिव- स्नेहा कांबळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष यश सोनावले, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष- काशिनाथ घोरगे, इशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष- मिलिंद कदम, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष- अशोक गुप्ता, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष-प्रशांत मेढे, उत्तर मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुनम शिंदे यांच्यासह सभाजी ब्रिगेड पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.  

या निवडणुकी द्वारे संभाजी ब्रिगेड नक्की काय करू इच्छिते? तर मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोतम खेडेकर साहेब सांगत असतात की खऱ्या अर्थाने देश हित साधायचे असेल तर राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता व प्रचार प्रसार माध्यम सत्ता या पाच सता ताब्यात असणं गरजेचे आहे, या सर्व क्षेत्रात छत्रपती शिवराय, ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जास्तीस जास्त लोकं जाणं गरजेचे आहे, राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाने नेमकं याच्या उलट केलं म्हणून आज देशाची ही दारुण अवस्था आहे. संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थाने मुंबईत राहणाऱ्या कामगार, कष्टकरी, आदिवासी छोटे उ‌द्योजक, फेरीवाले, यांच्या साठी काम करणार असल्याचे आश्वासनही राणे यांनी यावेळी दिले. 

 देवेंद्र फडणवीस गृहराज्य मंत्री असताना त्यांनी बिल्डरांशी साटलोर्ट करुन मुंबईतील जवळ जवळ २८ हजार झोपड्या पुनर्वसन नावाखाली तोडल्या, आज ते मुंबई कर बेघर आहेत, त्यांना त्याच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार.  मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानाच्या ह‌द्दीतील आदिवासी व बिगर आदिवासी मागासवर्गीय हे वीज, पाणी, शौचालय, शाळा या मूलभूत गरजपासून वंचित आहेत. त्यांना सोई सुविधा देणं हे पहिलं कार्य राहिल. क्र. ३. संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानाच्या हद्‌दीतील आदिवासी बिगर आदिवासी मागासवर्गीय समिक्षांककुटुंबाचे पुनर्वसन त्याच्या राहत्या घरापासून ३ किलोमीटर च्या ह‌द्दीत करण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार. मुंबईतील फेरीवाल्यांचा उचित सर्व्हे करुन त्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देन्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार. महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत मुलींसाठी मानसिक वा शारीरिक दृष्ट्या मजबूत करणेसाठी कुंफू चे वर्ग तसेच समुपदेशन वर्ग मोफत चालवीण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार.

महिला सुरक्षेसाठी मुंबईतील प्रत्येक ठिकाणी CCTV बसविण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार. मुंबईच्या लोकसंख्येच्या मानाने सर्व सुविधानी पुरेपूर मोठी रुग्णालये खूप कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सुसज्ज रुग्णालय असावे, त्यात डॉक्टर्स असावे, सर्व सुविधा असाव्याय यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार. मुंबईची ओळख ही मुंबईतील कोळी समाज व त्यांची मच्छी मार्केट ही आहेत, मागील काही वर्षात विकासाच्या नावाने यांच्यावर संकट आलेलं आहे, मुंबईतील कोळी बांधवाना पहिला मुंबई कर म्हणून योग्य तो सन्मान देऊन त्यांच्यासाठी आहे त्याच ठिकाणी सुसज्ज व साफ असे मोफत मच्छि मार्केट उभे करण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडणार. मुंबईतील शिवस्मारक भिम स्मारक, मराठा समाजास ओबीस मधुन आरक्षण, ओबीस आरक्षणाचे संरक्षण, जातीनिहाय जनगणना, शेतकरी आत्महत्या, शेतमाला हमीभाव, नोकरदार, कामगार, विद्यार्थी या अनेक ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या मुलभुत हक्क अधिकारासाठी आक्रमकरित्या विधानसभेत आवाज बुलंद करण्यासाठी मुंबईतील जनतेने सभाजी ब्रिगेड पक्षास पाठिंबा द्यावा असे आवाहन राणे यांनी शेवटी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com