२ नोव्हेंबर रोजी दिव्यात्मा बाब आणि ३ नोव्हेंबर रोजी अवतार बहाउल्लाह, बहाई विश्वधर्माच्या दोन पावन अवतारांची जयंती. या सलग दोन जयंतींना बहाई अनुयायी "युगल पवित्र दिवस" म्हणून संबोधतात. मुंबई शहरातील बहाई समुदायाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरी केला. २ नोव्हेंबर रोजी इराणच्या शिराझ येथे १८१९ येथे जन्मलेल्या सय्यद अली-मुहम्मद, ज्यांनी नंतर "बाब (म्हणजे द्वार)" ही पदवी धारण केली, त्यांच्या जन्मदिवस स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केला जाईल. बहाई विश्वधर्माचे संस्थापक बहाउल्लाह ह्यांच्यासाठी आध्यात्मिक तयारी प्रदान करणारे हे अग्रदूत होते. ३ नोव्हेंबर रोजी इराण देशात नूर येथे १८१७ रोजी जन्मलेल्या बहाउल्लाह (जन्म नावः मिर्झा हुसैन अली) ह्यांचा जन्मदिवस साजरा केला जाईल. बहाउल्लाह म्हणजे "परमेश्वराची महिमा". त्यांच्या शिकवणीं आणि पवित्र लिखाणे हा बहाई विश्वधर्माचा आधार आहे. सर्वसमावेशक धर्मविश्वास, ज्याचे अनुयायी "विविधतेत एकता" यांवर भर देतात, आणि आशा करतात की वैश्विक समुदाय सर्व पृथ्वी आणि मानवजात एकसमान आहे हे मानतील. बहाई विश्वधर्म त्याच्या स्थापनेपासून, जगभरातील जवळजवळ प्रत्येक देश आणि प्रदेशात स्थापित झाला आहे आणि त्याचे ६० लाखांपेक्षा जास्त अनुयायी आहेत.
युगल अवतारांचे प्रकटीकरण एक अद्वितीय घटना-शतकानुशतके, जगातील लोक ईश्वराने वचन दिलेल्या दिव्य युगाची प्रतीक्षा करत आहेत, असे युग जेव्हा पृथ्वीवर शांती व सौहार्द स्थापित होईल. बहाई श्रद्धावंतांचा असा विश्वास आहे की त्यांचे जुळे संदेष्टे म्हणजे, दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह हे वचन दिलेल्या दिव्य युगाची भविष्यवाणी पूर्ण करतात. "युगल अवतारांचे प्रकटीकरण" ही बहाई धर्मविश्वासुंसाठी एक मूलभूत कल्पना आहे, कारण दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह ह्यांच्या दैवीकार्यात एक अविभाज्य संबंध आहे: दिव्यात्मा बाब ह्यांचे ध्येय "ज्याला ईश्वर प्रकट करील", जे अवतार बहाउल्लाह ह्यांच्या रुपात प्रकट झाले, त्यांच्या प्रकटीकरणासाठी मार्ग तयार करणे होते. या कारणास्तव, दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह हे दोन्ही अवतार बहाई धर्मश्रद्धेत केंद्रबिंदू म्हणून पूज्य आहेत, जे एकत्रितपणे जगातील सर्व धर्मांमध्ये वचन दिलेली शांती आणि न्याय प्रस्थापित करतील.
१८४४ मध्ये घोषित केल्यानंतर, बाबी धर्मश्रद्धा १८५० पर्यंत म्हणजे त्याचे संस्थापक, दिव्यात्मा बाब, ह्यांच्या शहादतापर्यंत मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहिली. दिव्यात्मा बाब हे ईश्वरी अवतार आणि एक महान धर्माचे संस्थापक होते तरीसुद्धा त्यांनी स्वतःला एक अग्रदूत असल्याचे मानले आणि आपल्या अनुयायांना उत्कटतेने येणाऱ्या दिव्य अवतार "ज्याला ईश्वर प्रकट करील" ह्यांच्या प्रकटीकरणास शोधण्यासाठी उद्युक्त केले. त्यांच्या स्वतःच्या मोहिमेनंतर, एकाच युगात दोन अद्वितीय अवतारांचे प्रकटीकरण अस्तित्वात आले. दिव्यात्मा बाब ह्यांच्या समर्पित अनुयायांपैकी एक होते मिर्झा हुसैन अली, ज्यांनी नंतर बहाउल्लाह, अर्थात 'परमेश्वराचे गौरव' ही पदवी धारण केली. १८६३ मध्ये, बाबी धर्मश्रद्धास्थापनेच्या एकोणीस वर्षांनंतर, बहाउल्लाह ह्यांनी जाहीरपणे घोषित केले की तेच आहेत ते प्रतिक्षित अवतार, ज्यांच्याबाबतीत दिव्यात्मा बाब ह्यांनी भाकीत केले होते आणि भूतकाळातील युगांमध्ये सर्व ईश्वरी अवतारांनी ज्यांच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती.
लहानपणापासूनच बहाउल्लाह जगातील दुःख आणि क्रौर्य बघून व्यथित झाले होते, आणि त्यांनी आपला वेळ गांजलेल्या, आजारी व गरीब लोकांना सहाय्य करविण्यात घालविला. दिव्यात्मा बाब यांना दैवी संदेशवाहक म्हणून स्वीकारल्यानंतर, त्यांची सर्व मालमत्ता जप्त गेली गेली आणि त्यांना चाळीस वर्षे तुरुंगवास आणि हद्दपारी भोगावी लागली. तथापि, दिव्यात्मा बाब ह्यांची शहादत आणि त्यांच्या हजारो अनुयायांच्या क्रूर हत्येनंतर, बहाउल्लाह ह्यांच्याकडे हजारो बाबी अनुयायी आणि इतर पर्शियाचे नागरिक जेव्हा येऊ लागले, तेव्हा हद्दपारी आणि तुरुंगवासादरम्यान त्यांचे दैवी प्रकटीकरण शिक्कामोर्तब झाले. त्यांचे विस्मयकारक व्यक्तिमत्व आणि आश्चर्यकारक अंतर्दृष्टीसोबत त्यांचे आध्यात्मिक विषयांवर भेदक खुलासे सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि समाजात त्यांचे कौतुक वाढवू लागले.
बहाई धर्मश्रद्धेच्या प्रस्थापनामुळे, एका युगात उद्भवणार् या दोन संबंधित परंतु स्वतंत्र धर्मांचे अस्तीत्व प्रत्यक्षात आले. या दोन दैवी प्रकटीकरणांमधील बंध आणखी मजबूत करणे म्हणजे त्यांचे दोन्ही जन्मदिवस सोबत साजरे करणे होय. यावर्षी "युगल जन्मदिनांचा उत्सव" किंवा "युगल पवित्र दिवस" २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यात्मा बाब ह्यांची जयंती आणि ३ नोव्हेंबर २०२४ रोजी बहाउल्लाह ह्यांची जयंती म्हणून साजरे केले जाईल. ईश्वराच्या रूपात दावा केलेला हा संदेश काय होता, ज्याने त्याच्या दोन उदात्त संदेशवाहकांना इतके दुःख दिले? प्रत्येक आदर्श विचार करणार् या व्यक्तीने स्वतंत्रपणे निष्कर्ष काढावे की ही आदर्शानी योग्यतेच्या कारणावरून आणखी एक कल्पित विचलन दर्शवित आहे, अथवा, त्यांच्या विषयीच्या अतूट प्रतिबद्धतेत काहीच कमी नाही, आणि खरोखरच ते 'पृथ्वीस स्वर्गात रुपांतरीत करू शकते हे रहस्य आहे.'
बहाउल्लाह म्हणतात, "त्या एकमेव सत्य परमेश्वराचा स्वतःस प्रगट करण्यामधील हेतु सर्व मानवजातीस सत्यता आणि प्रामाणिकता, पावित्र्य आणि विश्वासपात्रता, परमेश्वरी इच्छेपुढे शरणागती आणि अनासक्ती, सहनशीलता आणि दयाळूपणा, न्यायनिष्ठा आणि बुद्धिमत्ता यासाठी पाचारण करणे होय. त्याचे उद्दिष्ट प्रत्येक मानवास सत्त्वशील चारित्र्याच्या पोषाखाने सजविणे आणि त्यास पवित्र आणि उदात्त कृत्यांच्या अलंकाराने भूषविणे होय."
0 टिप्पण्या