Top Post Ad

लोकशाही वाचविण्यासाठी बाबा आढाव यांचा आताच कसा आत्मक्लेश?

शरद पवार बामण विरोधी आहेत, बामणांना शिव्या देत असतात, परंतु शरद पवारांचे राजकीय गुरु एस, एम ,जोशी व तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे दोघेही बामण आहेत.       यशवंतराव चव्हानांचे मानस पुत्र असलेल्या शरद पवारांनी आई बापाचा शेकाप पक्ष सोडून यशवंतरावांचे बोट धरून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज़िल्हा परिषदनंतर विधानसभा व गृहराज्यमंत्री पद अशी घोडदौड यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने पार केली, त्या नंतर पुलोद सरकार स्थापन करण्यात एस. एम .जोशी यांची शिकवण त्यांचा गुरुमंत्र कामी आला. पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना वाऱ्यावर सोडून एस .एम. जोशी यांचे शिष्यत्व स्वीकारले , हीं पश्वभूमी सांगण्याचे कारण लोकशाही वाचविण्यासाठी बाबा आढाव यांनी सुरु केलेले आत्मक्लेश आंदोलन बाबा आढाव देखील एस एम जोशी यांचे शिष्य... त्यामुळे शरद पवार व बाबा आढाव हे गुरु बंधू आहेत. 


  पुण्यात एकेकाळी समाजवाद्यांचा दबदबा होता, एस .एम .जोशी, ना. ग. गोरे पुण्याचेच 1972 च्या काळात दलित पँथर चळवळीचा उद्रेक झाला. शरद पवार, एस एम जोशी, ना ग गोरे यांच्या पुण्यात पँथरला फार मोठा प्रतिसाद मिळाला .पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा गावात दलितांवर बहिष्कार टाकला. हीं खबर पँथरपर्यंत पोहचताच मुंबई पुण्यातून हजारो पँथर मिळेल त्या साधनांनी बावडा गावात पोहचली, बावडा गाव दणाणून गेले. जातीयवादी मराठे पळून गेले ( बावडा हे सिनेमा स्मिता पाटील हिचे गाव ) पुणे जिल्हा हादरून गेला ..... 

     शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांना पुण्यात पँथरने काळे झेंडे निदर्शने घोषित केले असता पोलिसांनी तुफान बंदोबस्त लावला. परंतु पँथरचा निर्धार गणिमी कावा कामी आला, इंदिरा गांधी याना मार्ग बदलावा लागला    पँथरचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी  काँग्रेस, समाजवादी कामास लागले, त्या कामाचा एक भाग अर्थात बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा हीं समांतर चळवळ सुरु केली ह्या एक गाव एक पानवठा सुरू केली. या चळवळीचे पुढे काय झाले, त्याची फलनिष्पती काय सर्वं गुलदसत्यात राहिले.    गुरुवर्य एस. एम. जोशी यांच्या गुरुमंत्रानुसार मुख्यमंत्री शरद पवारांनी 27 जुलै 1978 रोजी विधानसभा व विधान परिषदेत मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठराव पारित केला. सायंकाळी सात वाजता रेडिओ वरून बातमी प्रसारित होताच मराठवाड्यात जातीय दंगल पसरली, दलित वस्त्यावर हल्ले झाले ,पोचिराम कांबळे ,जनार्दन मवाडे यांची अमानुष हत्या झाली. उभ्या पिकांना आगी लावण्यात आल्या, पिण्याच्या पाण्यात एड्रीन नावाचे विष मिसळविण्यातं आले. एक महिना मराठवाडा जळत होता. परंतु शरद पवार सरकारने मराठवाड्यात गोळीबार सोडा साधा लाठीहल्ला केला नाही. *धिस इज पॉलिटिकलं ए एजिटेशन गो स्लो* अश्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या. 

     शरद पवारांनी गोळीबार केला. नागपुरात इंदोरा चौकात दिलीप रामटेके सोबत चार भीमसैनिकांचे मुडदे पाडले.    मराठवाड्यातील दलितांना सरक्षण द्यावे, मराठवाड्यात मिलिटरीला पाचारण करण्यात यावे, दलितांना संरक्षणासाठी  हत्यारे द्यावीत, ह्या मागण्यासाठी नागपुरातील दलित आंबेडकरी जनतेने 4 ऑगस्ट 1978 रोजी मोर्चा काढला त्या मोर्चा वर शरद पवारांनी शूट ऍट साईट अशी ऑर्डर दिली.    नामांतर आंदोलन पेटू नये उग्र होवू नये, याकरिता एस. एम. जोशी, शरद पवार यांनी बाबा आढाव यांचा खुबीने वापर केला.     नामांतरवादी समूहात विशेषतः दलित आंबेडकरी समाजात फूट पाडण्यासाठी बाबा आढाव यांनी पुण्याचे प्रा बापूराव जगताप यास हाताशी धरून पुण्यात नामांतर कृती समिती स्थापन केली.      6 डिसेंबर 1979 रोजीचे ऐतिहासिक लॉन्गमार्च आंदोलनात फूट पाडण्याचे कसोशीने बाबा आढाव, बापूराव जगताप यांनी केले. सत्याग्रही भडकले .गेट वे ते क्रांती चौक असा निरर्थक वाद उभा करून आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचे पाप केले.

    प्रा जोगेंद्र कवाडे यांचा लॉन्गमार्च सिंदखेडराजा येथील राहेरी नदीच्या पुलावर अडविण्यात आला.हजारो भीमसैनिकांना अमरावती तुरुंगात डांबले. ह्या शरद पवारांच्या दडपशाहीला बाबा आढाव मंडळीची साथ होती. अन्यथा नामांतर 6 डिसेंबर 1979 लॉन्गमार्च आंदोलनात झाले असते, यांची कबूली एस. एम. जोशी यांनी नागपुर तुरुंगात दिली होती. आम्ही मुंबईतील भीमसैनिक नागपूर तुरुंगात अटकेत होतो, त्याच वेळी शेतकरी दिंडी घेऊन एस. एम. जोशी देखील एक दिवसासाठी नागपूर तुरुंगात आले असता आम्ही त्यांना भेटलो सरळ प्रश्न केला अण्णा (एस एम जोशी यांना अण्णा म्हणतात ) तुम्ही एक दिवस नाही, एक तास जरी तुरुंगात गेले असते तर शरद पवारांना नामांतर करावे लागले असते ,त्या वेळी एस एम जोशी म्हणाले होते ती चूक झाली मी बाबा आढाव यांचे ऐकले असते तर बरे झाले असते असे शरद पवार यांचे सूचक उद्गगार काढले.

        असे बाबा आढाव लोकशाही वाचविण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षी आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत.        बाबा आढाव आत्मक्लेश करून घेत आहेत, त्या बाबा आढावांना आमचा प्रश्न आहे निवडणुकीत वारेमाप पैशाचा वापर कधी, कुणी, सुरु केला याचा आपल्या आत्म्याला विचारा साखर कारखानदार शिक्षण सम्राट, दारू सम्राट, दूध डेरी सम्राट ही सम्राट गँग तुमच्या पुणे पश्चिम महाराष्ट्रातील आहे ना, सुरेश कलमाडी पुण्याचेच ना ....त्यावेळी आत्मक्लेश का नाही आठवला? निदान एखादी टाचणी तरी टोचून घ्यावयाची होती .. शरद पवारांच्या तालावर नाचणाऱ्या बाबा आढाव यांनी निदान लोकशाही वाचविण्याच्या बाता करू नये, तूर्तास इतके पुरे

  •  *तानसेन ननावरे* युनायटेड रिपब्लिकन पार्टी...मो. 8169218015
  • शब्दांकन... *महादू पवार* पत्रकार, मुंबई
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुणे येथे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानातील चढ-उतार आणि ईव्हीएम घोटाळ्याबाबत उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाचा तिसरा दिवस होता.  शनिवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी देखील उपस्थिती दाखवली होती. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ. बाबा आढाव यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे येथे जाऊन डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली आणि आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. पुढील आंदोलन महाविकास आघाडी करेल असे सांगितले. डॉ. बाबा आढाव यांना पाणी पाजून सदर उपोषण सोडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com