परभणी शहरातील भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील सविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या चाळीस भीमसैनिकांपैकी एका भीमसैनिकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी संविधान प्रेमी संघटना आणि पक्षांना उद्या सोमवारी 16 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
परभणीमध्ये सविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निदर्शने आंदोलने करण्यात आले. या घटनेचा निषेध करणाऱ्या भीम सैनिकांवर परभणी पोलिसांकडून लाठीचार्ज व कोबिंग ऑपरेशन करण्यात आले. शेकडो भीमसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 40 भीमसैनिकांना पोलिसांकडून न्यायालयात कोठडी मागवून घेण्यात आली होती. त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी 33 या तरुणाचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेचा निषेध केला जात असून या प्रकरणातील जबाबदार पोलीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. एका बाजूला संविधान प्रतिकृती अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा भीमसैनिकांनाच लक्ष करण्यात येत असून पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा मृत्यू म्हणजेच एका भीमसैनिकांचा पोलिसांनी बळी घेतला आहे .या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये संविधानप्रेमी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.महादू पवार.....पत्रकार, मुंबई
+++++++++++++++++++
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवून फक्त ५ दिवस झाले नाहीत की परभणी प्रकरण घडले. त्यानंतर परभणीत पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली आंबेडकरी वस्त्यांना टार्गेट केले. कोबिंग आॅपरेशन करत घरात घुसून मारहाण केली गेली. दिवसभर निर्दयपणे पोलिसांनी तरुणांवर बळाचा वापर केला. अनेक तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. निर्दोष तरुणांची धरपकड सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना ऐवढा “फ्री हॅण्ड” दिल्याने हे चित्र दिसत आहे. या प्रकरणात शिवसेना आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका संशयास्पद आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सालगडी असलेल्या पोलिसांना तपास करावा. मास्टरमाईडला सोडून निष्पाप तरुणांना अटक केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी जे भिमा कोरेगांव प्रकरणात केले होते, तीच एक्शन परभणीत दिसत आहे. भिमाकोरेगाव प्रकरणातील केसेस सरकारने अजूनपर्यत मागे घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आंबेडकरी भावांनो क्रोनालाॅजी समजून घ्या. हे अचानक घडलेलं नाही. तर घडवून आणलेले आहे. मिडीया आपल्याला खलनायक दाखवून पोलिसांच्या जाचक कारवाईला लपवत आहे. आंदोलन हे न्यायासाठी असते. आंदोलन पिढ्यानपिढ्या घडविण्यासाठी असायला हवे, पिढ्या उध्वस्त करण्यासाठी नाही. आपण आपल्या भविष्यासाठी धोरणात्मक भूमिका घेऊन लढा दिला पाहिजे. मागे दिल्लीत संविधान जाळले होते, आज परभणीत संविधान फोडले. हे होत राहील. त्यासाठी आता आपल्यालाच बदलावं लागेल. आपण बदल घडवणारा आणि दिशा देणारा या भूमिवरचा समाज आहोत. हे लक्षात असू द्या!
- राहूल प्रधान
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
0 टिप्पण्या