देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानास्पद वक्तव्यानंतर भारतभर जोरदार निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. यामुळे भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले असून विरोधाला विरोध करण्यासाठी भाजपने मुंबई येथील आझाद मैदान परिसरातील कॉंग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक व तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी वेळीच कारवाई करत आंदोलकाना ताब्यात घेतले आहे. मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाला असून त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काँग्रेस कार्यालयात भाजप कार्यकर्ते चालून गेले आणि तिथे मोठा गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाईफेक केली, दगडफेक करत तोडफोडही केली. त्यामुळे तिथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. मुंबई कॉंग्रेसच्या मागच्या प्रवेशद्वाराने राजीव गांधी भवनकडे येत सुरुवातीला डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देऊन कॉंग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली.
तसेंच कार्यालयाबाहेर असलेल्या राजीव गांधी, सोनिया गांधी व मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या पोस्टर वर शाईफेक करून कार्यालयातील सामानाची तोडाफोड केली. यावेळी आझाद मैदान पोलिसांनी आंदोलकाना आवर घालण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक हिंसक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून 12 आंदोलकाना ताब्यात घेतले. आझाद मैदान पोलसांनी तजेंदर सिंह तिवांना यांच्या सहित 12 आंदोलकानावर कारवाई करुन ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलकांनी आणलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व गळ्यातील भाजपचे मफलर टाकून जागेवरून पळ काढला.
भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला, हा सत्तेचा माज असून अशा भ्याड हल्ल्याला काँग्रेस कार्यकर्ते भिक घालत नाही. सरकारने या गुंडांना तातडीने अटक करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
भाजपाच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित, आदिवासी समाजाबद्दल भाजपाची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे. अमित शाह व भाजपाने यावर माफी मागितली नाही उलट भाजपाचे लोक गुंडगिरी करत आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना कसलीही तमा न बाळगता सरकारने तातडीने अटक केली पाहिजे. भाजपाच्या गुंडगिरीला त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक काँग्रेसमध्ये आहे पण काँग्रेस अहिंसेचा मार्ग अवलंबत आहे. पण कोणी आमच्यावर हल्ला करत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. सरकारने तात्काळ या गुंडांवर कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार असेल हे लक्षात ठेवा असा इशाराही वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या