महाराष्ट्रातील बौद्ध साम्राज्याचा ठोस पुरावा असलेल्या सोपारा स्तुप उत्खननात सापडलेल्या बौद्धकालीन शिल्प आणि वस्तूंचे तसेच समकालीन प्राचीन वस्तूंचे प्रदर्शन विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात भरवण्यात आले आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन नि:शुल्क खुलं राहणार आहे.
भारतीय पुरातत्व शास्त्राचे शिल्पकार डॉ. एस सी. सांकालिया यांची जयंती १० डिसेंबर रोजी असते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्व विभाग, बौद्धविद्या विभाग, पर्यटन मंत्रालय, लब्दी विक्रम जनसेवा ट्रस्ट, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाउंडेशन, पुरासंस्कृती आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ४ दिवसाचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत पार्ल्यातील साठे महाविद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.- दुर्मिळ शिल्प, दस्तावेज, वस्तू पाहण्याची संधी !
या प्रदर्शनात बौद्धकालीन सोपारा येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत. तसेच प्राचीन काळातील भांडी आणि पुराजैव शास्त्रीय नमुने आहेत. वीरगळ आणि सतीशिला यांचे खास प्रदर्शन येथे आहे..
श्रीकांत जाधव...मुंबई
0 टिप्पण्या