महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जनसागर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. पाच तारखेपासूनच चैत्यभूमीकडे जाण्यासाठी रांग लागते ती सात डिसेंबरच्या पहाटेपर्यंत सुरूच असते. चैत्यभूमीपरिसरातील रांगेचे आणि इतर सोयी सुविधांचे समता सैनिक दल योग्य प्रकारे नियोजन करते. चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसरात ओसंडून वाहणारा हा जनसागर पाहिला की बाबासाहेबांच्या अथांग प्रतिभेची जाणिव होते. शिवाजी पार्क परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकरी अनुयायांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात. तसेच या दिवशी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी पुस्तिका देखील महापालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात येते. या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत गीतांचा समावेश करण्यात आला आहे. ही पुस्तिका महापालिकेच्या वतीने मोफत वितरीत करण्यात येते.
शिवाजी पार्कवर अनेक पक्षांच्या अभिवादनपर सभाही आयोजित केल्या जातात. अभिवादन करण्यास आलेल्या प्रचंड जनसमुदाय आयताच या पक्षांना मिळत असल्याने वर्षानुवर्षे या दिवशी या सभांचे आयोजन केले जाते. राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना मुंबईतील अनेक संस्था संघटना भोजनाची व्यवस्था करतात. यासाठी महापालिकेने देखील वेगळा भोजन कक्ष उभारला आहे. जेथे आंबेडकरी अनुयायी निवांत पणे भोजन करू शकतात. तसेच अनेक मोठ्या संस्था-संघटना चहा नाश्ता देखील वाटप करतात. सर्वात जास्त गर्दी असते ती या ठिकाणी असलेल्या पुस्तक स्टॉल्सवर. जेथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत, आंबेडकरी चळवळीबाबत भाष्य करणारी तसेच बौद्ध धम्माबाबत माहिती देणारी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात. या दिवशी पुस्तकांची विक्री करोडोंने होते. यामुळे प्रत्येक वर्षी पुस्तक विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे. इतर वेळेस कोठेही न मिळणारी पुस्तके या दिवशी मात्र हमखास मिळतात. म्हणूनच प्रत्येक आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या आवडीची पुस्तके घेत असल्याचे चित्र पहायला मिळते. तसेच आजच्या दिवशी अनेक वर्तमानपत्रे आपला विशेष अंक प्रकाशित करून बाबासाहेबांना अभिवादन करीत असतात. ज्यात यावर्षी प्रामुख्याने प्रा.प्रेमरत्न चौकेकर संपादीत सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचा उल्लेख करावा लागेल. ***********
रमाई नगरात पत्रकारांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मदत अभियान
डॉ: भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगरात "एल्गार पत्रकार संघ" द पब्लिक टीव्ही न्यूज (सर्व मीडिया सहकारी) यांच्या संयुक्त विद्यमाने " विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मदत अभियान" राबविण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना बिस्कीट, पाणी, चहा वाटपही करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकारांच्या वतीने प्रथमच करण्यात आले होते. त्याचा शेकडो भीम अनुयायांनी याचा लाभ घेतला याप्रसंगी रमाबाई नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यास आलेल्या स्थानिक आमदार परागभाई शहा, राखी जाधव, अशोक हिरेकाका, राजा गांगुर्डे, रवी नेटावटे, भाई जाधव ( दलित पॅंथर) सम्राट स्पोर्ट्स क्लब, शहीद स्मारक समिती, बाबु मोरे,तरुण मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिती होते. तसेच एल्गार पत्रकार संघाचे पत्रकार सभासद व इतर वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
***********
मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने स्वच्छता अभियान राबवून मानवंदना
मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील स्वच्छता अभियान स्वच्छ आपली चैत्यभूमी उपक्रम राबविण्यात आला. देशभरातून असंख्य अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, दादर या ठिकाणी येत असतात.त्याच उद्धेशाने परीस्थितीला अनुसरून टाकाऊ कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अभियान जनजागृती करण्यासाठी रात्री ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियान मध्ये असंख्य युवक , युवतींनी सहभाग घेतला.शेवटी सर्वांचे आभार मानले आणि सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.
***********
धानोरी- येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
धानोरी- येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस फुलहार अर्पण करून अभिवादन करताना ज्येष्ठ पत्रकार व ग्राहक पंचायत संघाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत उत्तमराव निकुंभ. व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
***********
संत लहानुजी महाराज विद्यालय चितलवाडी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावामध्ये संत लहानुजी महाराज विद्यालय येथे सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन करून संपन्न झाला
यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर भाषण देऊन गीत गाऊन त्यांना वंदन केलं यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली वानखडे मॅम, बाजारे मॅम, खारोडे सर, इंगळे सर इत्यादी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते
डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन सर्व एकसंघ होऊ - सरपंच रूपाली नाईक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माणसांचे जगणं समृद्ध करतात. बाबासाहेबांचे विचार व त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकसंघ होऊन समाजात वावरले पाहिजे, असे प्रतिपादन मांगल्याचे मठ ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली अजित नाईक यांनी केले. महिलाच्या अधिकारांसाठी डॉ. बाबासाहेबांचे मोठे योगदान असल्याचे सरपंच रूपाली नाईक यावेळी म्हणाल्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मांगल्याचे मठ ग्रामपंचायत वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सभेत रुपाली अजित नाईक,(सरपंच, ग्रा प मठ), विकास केळुसकर (ग्रामसेवक मठ), सोनिया मठकर (ग्रा,प सदस्य),शमिका मठकर(ग्रा, सदस्य) संतोष वायंगणकर (ग्रा प सदस्य), नित्यानंद शेणई (ग्रा प सदस्य) प्रकाश बोवलेकर, बागायतकर, तसेच सिद्धार्थनगर मठ येथील उमेश मठकर, स्वप्नील मठकर, मिलिंद मठकर, मंदार मठकर, दत्तप्रसाद मठकर तसेच यशश्री मठकर, मानसी मठकर, शिवाली मठकर आदी ग्रामस्थ उपस्थितीत होत्या.यावेळी बाबासाहेबांना सामूहिक अभिवादन करून अभिवादन करण्यात आले.
***********
प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन व प्रज्ञा प्रतिष्ठान तर्फे भिम अनुयायांना मोफत भोजनदान
प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन व प्रज्ञा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभुमि येथे आलेल्या आंबेडकरी अनुयायांना शनिवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भोजन वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमास डॉ.बाबासाहेंब आंबेडकर समाजभुषण व कार्याध्यक्ष गौतमी सुनिल जाधव, संस्थेचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे,कोषाध्यक्ष नितीन दिवेकर,संजिवन जैयस्वार,शकील खान,स्वाती देवळेकर,लक्ष्मी कावळे,अपर्णा कासारे,कृष्णा गायकवाड,डॉ.बाबासाहेंब आंबेडकर समाजभुषण व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भिमराव साळवी, मुकेश दिवेकर, विनित कासारे, वैभव जाधव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी आर्थिक सहकार्य व अथक प्रयत्न करून कार्यक्रमास योगदान दिले
--------------------------------------------
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि अभ्यासिका चे उद्घाटन
सारनाथ बुध्द संस्कार ट्रस्ट सातिवली वसई ( पूर्व) यांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिवाॅण दिनी सारनाथ बुद्ध विहार सातिवली येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली . यावेळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि अभ्यासिका चे उद्घाटन करण्यात आले.या वाचनालया साठी आंबेडकरी चळवळीतील स्थानिक ज्येष्ठ कायॅकतेॅ आयु. चिंतामण बाबु जाधव व सौ. आशा चिंतामण जाधव यांच्या तर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील 90 पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी ट्रस्ट चे सदस्य सुशांत जाधव ,विनोद गायकवाड, प्रसन्न भाताणकर, मंगेश सावंत, संतोष जाधव , रवींद्र गायकवाड रामनरेश जयस्वाल,रूपेश जाधव, दिपक जाधव इत्यादीं कायॅकते उपस्थित होते.
0 टिप्पण्या