Top Post Ad

शासन प्रायोजित अत्याचार जगासमोर आणण्याची नितांत गरज

नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन केलेच नाही. शहीद सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कस्टडीत झाला नसून त्यास श्वसनाचा त्रास होता.. त्याच्या अंगावर आधीच जखमा होत्या.. वगैरे वगैरे अशा प्रकारे विधानसभा सभागृहात अत्यंत खोटे आणि विसंगत स्टेटमेंट दिले. त्यांनी एक प्रकारचे पोलिसांना क्लिन चिटच दिली आहे. आता चौकशी जरी झाली तरी मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट च्या आधारेच केल्या जाईल यात तिळमात्र शंका नाही. परंतु आंबेडकरी समाजाने असे कितीक अत्याचार सहन करावेत ? आणि पूढील अत्याचाराच्या घटनांची वाट पाहत त्यालाही सामोरे जायचे ?

राज्यातील सरकारचे आंबेडकरी समूहावरील अत्याचाराचे धिंडवडे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी व्हिडीओ चित्रफीत तयार करणे आवश्यक आहे.हि चित्रफीत मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत तयार करावी.
1. घटनेच्या आधी हिंदुत्ववादी संघटनांनी परभणीत काढलेला मोर्चा. सभेत झालेले संविधानाच्या विरोधात भडक भाषणे.
2.त्यानंतर पवार नावाच्या इसमाने संविधानाची प्रतिकृती जाणीवपूर्वक फोडणे.
3.त्या घटनेविरोधात संविधानावादी संघटना, नागरिकांचा शांततेचा मार्च.
4.त्यानंतर काही तासातच शहरात तोडफोडीच्या घटना. तोंडावर कापडे बांधलेले व्यक्तींनी आंबेडकरी समूहाला बदनाम करण्यासाठी शहरात घातलेला हौदस.
5.त्या नंतर पोलिसांनी केलेले कोंबिंग ऑपरेशन. निरपराध लोकांना, स्रीपुरूष ,तरुण तरूणीना मुलांना बेदम जिवघेणी मारहाण. पोलिसांनी केलेली घरदार, वाहणांची तोडफोड.
6.शहिद सोमनाथ सुर्यवंशी ला अटक आणि पोलीस कस्टडीत पोलिसांकडून बेदम अमानुष अमानवीय अत्याचार व त्यात पोलिसांनी सोमनाथचा केलेला खून.
7.इतरही लोकांवर महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार
या इतरही घटनाक्रम एका व्हिडीओच्या माध्यमातून तयार करावा.सोशलमिडीयावर पोलीस अत्याचाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अगदी पहिल्या घटनेपासून तर शेवटच्या घटनेपर्यंत बरेच लोक साक्षीदार आहेत. त्यांच्या मुलाखती, शहिद सोमनाथ यांच्या आई व परिवाराच्या साक्षी टिपणे आवश्यक आहे. कोंबींग ऑपरेशन दरम्यान मा बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांना फोनवरून दिलेली माहिती ह्याचा सुध्दा संदर्भ आवश्यक आहे.
8. पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या शहिद सोमनाथ याचा पोस्टमार्टेम / पोस्टमार्टेम रिपोर्ट. पोलीस मारहाणीत झाल्यामुळे..
9. शहिद सोमनाथ चा अंत्यसंस्कार परभणी येथे न करता लातूरला करा म्हणून रस्त्यात पोलिसांचा दबाव.मा बाळासाहेबांचा पोलीस अधिकाऱ्यांचा फोन.
10. शहिद सोमनाथ यांच्यावर परभणीत लाखोंच्या उपस्थितीत झालेला भावभिनी अंत्यसंस्कार.
11. युवा नेते सुजात दादा यांनी परभणीत जाऊन केलेली पाहणी. शांततेचे केलेले आवाहन.
12.या अनुषंगाने घडलेल्या विविध घटना...
क्रमवार घटनांचा मागोवा घेऊन अर्ध्या पावून तासाची चित्रफीत तयार करावी.
आंबेडकरी समाजात अनेक अष्टपैलू तरुण आहेत. परभणीत सुध्दा आहेत. मुंबई पुण्यातील टेक्निकल तरूणांचीही मदत घेतल्यास उत्तम. परभणीतील चळवळीतील तरूणांनी या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे.
सुरेश शिरसाट, अकोला
*******************************



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com