भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अमित शहा हाय.. हाय.., राजीनामा द्या...राजीनामा द्या.., नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी.. अशा घोषणा करून निषेध व्यक्त केला.
त्यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उप शहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, प्रमिला भांगे, नगरसेविका नंदिनी विचारे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, सुनिता आरकडे, विभागप्रमुख जिवाजी कदम, प्रकाश पायरे, प्रशांत सातपुते, राजू शिरोडकर, संजय दळवी, लहू सावंत, पप्पू आठवाल, राजू ढमाले, अमोल हिंगे, बिपीन गेहलोत, फिरोज शेख, सचिन कर्डिले, मधु जांभारकर, राकेश जाधव, बाळा मांडकुलकर व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या