धर्मांध तथा समाज कटंक माथेफिरू लोकं देशद्रोही तथा देशविघातक कृत्य हे मुद्दामहून करत नाहीत तर ते तुम्हाला आम्हाला चिडवण्यासाठी जाणिवपुर्वक सत्ताधा-यांच्या मदतीने घडवून आणल्या जात असते, जेणेकरून आपण चिडून जाऊन नकारात्मक प्रतिक्रिया द्याव्यात, आपण कायदा हातात घ्यावा, आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला तेच हवं असतंय, या अशा तीव्र प्रतिक्रियांमध्येच आपण पडून रहावं हेच त्यांना हवं असतंय, आणि त्यांनी केलेल्या नियोजनाला आपण सातत्याने बळी पडत आहोत, हे आपल्याला का कळू नये याचं मोठं आश्चर्य वाटतं, आपल्या चळवळीचे भवितव्य ते उध्वस्त करू पहात आहेत हे आपण समजून घ्यायला हवं, त्यासाठी आतातायीपणाने आणि चुकीचे कृत्य करून नव्हे तर बुध्दीबळाने धर्मांध प्रस्थापितांना अर्थात धर्मांध व्यवस्थेला हरविण्यासाठी एक होऊन विखुरलेल्या समाज नेतृत्वामधून एक पक्कं आणि मजबुत नेतृत्व उभं करायला हवं,
सत्तेच्या रिंगणात आम्ही जोपर्यंत मजबूत पाय रोवत नाहीत तोपर्यंत आपल्यावरील अत्याचार संपणार नाहीत, सत्तेचा गैरवापर करून तुमचे आमचे आयुष्य उध्वस्त करणारी ही सत्ताधा-यांच्या मदतीने धर्मांधाना खेळायला लावणारी ही खेळी आहे हे ओळखायला हवं.. अशे विघातक कृत्य ही प्रस्थापित व्यवस्था आजपर्यंत करत आली आहे आणि ती पुढेही करतच राहणार आहे, परंतू एक लक्षात घ्या, जसे अन्याय झाल्यावर ज्या ताकदीने आपण पुढे येतो तसे सगळे हेवेदावे बाजूला सारून एक होतो, तसेच एकदा बुध्दीबळाने सत्तेचा चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी एक होऊ या, तरच आपल्याला चळवळीचा बालेकिल्ला अबाधित ठेऊन संविधानासह देशाचं रक्षण करता येईल.. अन्यथा धर्मासाठी संविधान कोरणारी उंदराची औलाद आणि धर्मासाठी देशाला लिलावात काढणारी सत्ता पिपासू धर्मांध ठेकेदार असे बिनडोक्यांची पिलावळ जन्माला घालतच राहणार.. निषेधांच्या धारा गुळगुळीत धाल्या आहेत त्यामुळे या प्रस्थापित व्यवस्थेला आता काही फरक पडत नाही, म्हणून सावध व्हा, देशाचे भवितव्य आपल्या हाती आहे, म्हणून अगोदर आपले भवितव्य उध्वस्त होऊ देऊ नका..संघर्ष तर करावाचा लागणार आहे परंतू तो आतातायीपणाने नव्हे तर बुध्दीबळाने करू या.. विकास साळवे,पुणे.. 9822559924..-------------------------------------
'रक्तपात,विघातक कृत्ये करणाऱ्याला माथेफिरू ' म्हणण्याची प्रथा आहे. तो वैद्यकीय निष्कर्ष मुळीच नसतो. त्यामुळे सूत्रधार शोधायला हवा. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील प्रकरणात तर आजवर ना माथेफिरू सापडला, ना त्यामागचे सूत्रधार!.... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात कितीदा रस्त्यावरची आंदोलने केली? आपल्या अल्पसंख्य समाजाच्या शक्ती प्रदर्शनावर सारी भिस्त त्यांनी कधीच टाकली नव्हती. त्या समाजाला कमीत कमी तसदी होईल, याची टोकाची काळजी घेत त्यांनी प्रश्नांच्या सोडणुकीसाठी आपले बुद्धी कौशल्य पणाला लावले होते. त्यांच्या लढ्याच्या एकूणच रणनीतीचा आजच्या नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी आणि समाजानेही अभ्यास करण्याची कधी नव्हती इतकी नितांत गरज निर्माण झाली आहे. कारण आजकालच्या आपल्या संघटनांचा सारा भर हा थेट समाज हिताच्या प्रश्नांऐवजी निव्वळ भावनिक प्रश्नांवर आणि त्यासाठी समाजाचा नाहक आणि व्यर्थ शक्तिपात करण्यावर राहिला आहे. आपल्या पाठी गर्दी जमवण्याचा त्यांना तोच सहज सोपा मार्ग वाटत आला आहे. - दिवाकर शेजवळकर (ज्येष्ठ पत्रकार)
... भारतीय संविधानाचे अपमान करणारा तो माथेफिरू, मनोरुग्ण होता हे मुख्यमंत्री महोदयांना कोणी सांगितले आणि या मनोरुग्णाला फक्त संविधानाचीच मोडतोड करायला कस कळत... माथेफिरू देशाच्या संविधानाची नासधूस करतो.. देशाच्या संविधानाचा अपमान अर्थात देशाचा अपमान करणाऱ्याला का वाचवीत आहेत..? देशाच्या संविधानाची अवहेलना करून देशद्रोह करणाऱ्याला भाजपा सरकार आणि प्रशासन का वाचवत आहे.. देशद्रोहीला फक्त अटक करून सोडून देणार त्याच्यावर देशद्रोह गुन्हा नोंदवून कारवाई का केली नाहीं..? या देशद्रोही चा मास्टर माईंड कोण आहे हे का लपवलं जात आहे..? देशद्रोही ला वाचवण्याचे देशद्रोही पाप भाजपा ने करू नये.. देश आणि देशाचे संविधान सर्वोपरी आहे.. तुम्ही व तुमचे सरकार देश आणि संविधानाच्या नंतर आहे संविधान व देशाचं सरक्षण करण्यास तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात....
- शिवानंद सनादे,
- मुलुंड...
0 टिप्पण्या