. कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर येथे एका कंत्राटी बसने रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनांना धडक दिल्याने 49 जण जखमी झाले. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात भीषण असल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
. बेस्टमध्ये खाजगीकरण झाल्यापासून असे अपघात वारंवार होताना दिसत असल्याचा आरोप विविध युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे . खाजगी बस या बेस्टच्या आगारातून बाहेर पडताना कोणत्याही तपासणी न करता रस्तावर सेवेसाठी उतरवल्या जातात. खाजगी बसचे ड्रायव्हर यांना योग्य ट्रेनिग्न नसल्याने त्यांना बस चालवता येत नाही. खाजगी बस चालक आणि वाहक यांना पगार अत्यंत कमी असल्याने ते बस चालवून इतर ठिकाणी दुसरी नोकरी करतात त्यामुळे त्यांची झोप नीट होत नाही. मुंबई कर जनतेस जर बेस्टची योग्य सेवा द्यायची असेल तर बेस्टचे खाजगीकरण बंद होणे आवश्यक आहे, असे मत युनियनने मांडले आहे.
बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले आणि अपघाताच्या पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरून आरोपीला २१ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली. अचानक गाडी समोर स्पार्क झाला आणि गाडीने स्पीड पकडला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे संजय मोरेच्या वतीने अॅड. समाधान सुलाने यांनी युक्तिवाद करताना सांगितले. त्यामुळे अपघातासाठी चालक मोरे नाही तर इलेक्ट्रिक वाहनामधील त्रुटी जबाबदार असल्याचा दावा आरोप करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे, आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीने बेस्टमध्येच काम करायचा. त्याला १० दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीने बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून नेमण्यात आले होते. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या