परभणी प्रकरणात तातडीने सीबीआय चौकशी लावून गुन्हेगारास तात्काळ शिक्षा करण्यात यावी यासाठी अन्याय-अत्त्याचार विरोधी कृती समिती, नागपूर च्या वतीने हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात आला होता. आज २० डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरात संविधान शिल्पाची झालेली मोडतोड व संविधान प्रेमिंचा अपमान या संदर्भात परभणी शहरातील सर्व आंबेडकरी व संविधान मानणाऱ्या जनतेनी आपला निषेध करण्यात आला. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही मागणी शासनापर्यंत पोहचविण्याकरीता शांततेत मार्च काढला.
परभणीतिल जेष्ठ नागरीक, तरूण, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांचा प्रामुख्याने समावेश होता. मार्च पुर्णपणे शांततेत घोषणा देत होता. परंतु हया मार्च मध्ये तोंडाला फडके बांधुन दहा ते बारा तरूण होते. त्या तरूणाद्वारे त्या ठिकाणी तोडफोड सुरू केली व शहतील शांतता भंग केली. ते तरूण कोण होते? यांची शहानिशा न करता किंवा चौकशी सुध्दा न करता आंबेडकरी समाजातिल तरूणांवर आरोप करून परभणी शहरातील गाव गुंडाना सोबत घेवुन क्रुरपणे मारहाण पोलीसांद्वारे करण्यात आली व जिवघेणा हमला सुध्दा पोलीसांद्वारे करण्यात आला. पोलीसांनी बौद्ध वस्त्यांमध्ये जावुन गाव-गुंडाना सोबत घेवुन महीला, मुलांना घराबाहेर काढून त्यांना जनावरांनाही मनुष्य भारत नाही त्यापेक्षाही क्रूरपणे अक्षरशाः तुडवून टाकले व जीवघेणे मारले सुध्दा. हथा प्रकारचे प्रसंग महाराष्ट्रामध्ये बौध्दांच्या विरोधात सातत्त्याने घडवुन आणल्या जात आहेत. हया सर्व घटनेचा महाराष्ट्रात व नागपूर शहरात प्रचंड असंतोष आहे व आंबेडकरी समाजात रोष आहे !सुसंस्कृत महाराष्ट्राची वाटचाल उत्तर प्रदेश प्रमाणे होत आहे काय ? अशी भिती सुध्दा महाराष्ट्रातील जनता व्यक्त करत आहे. शासनाने पोलीस विभागाला अश्या प्रकारच्या अमानुष कार्यवाहीची खुली परवानगी दिली आहे काय ? सदर प्रकरणात शासन त्वीत चौकशी लावून गुन्हेगारास शिक्षा देत नाही तो पर्यंत आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. ह्या करीता आंबेडकरी समाजाच्या भावना आपणा पर्यंत पोहचविण्याकरीता मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिनेश अंडरसाहारे, सुरेश पाटील, मनोज बन्सोड, उमेश बोरकर, छायाताई खोब्रागडे, नरेश वाहाणे, दिपक डोंगरे, आचल ठोक यांनी मुख्यमंत्र्यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात दिले
- 1) भारतीय राज्य घटना विटंबना प्रकरणातील आरोपी सोपान पवार व वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक घोळबंद यांची नार्को चाचणी त्वरीत करण्यात यावी.
- 2) पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यु झाला त्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकावर कलम 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा.
- 3) संपूर्ण परभणी प्रकरणाची चौकशी राज्य पोलीसांकडून काढून त्वरीत सी.बी.आय. कडे वर्ग करावी.
- 4) पोलीस कोठडीत मृत्यु असल्यामुळे निवृत्त न्यायधीश उच्च न्यायालय अभय टिपसे यांच्या न्यायालयीन आयोगामार्फत तीन महिण्यात चौकशी पुर्ण व्हावी. सदर चौकशी संविधानाचे विटंबन ते नंतरच्या कार्यकर्त्यांचे मृत्यु पर्यंतचा समावेश करावा.
- 5) जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक आणि सदर प्रकरणातील पोलीस कर्मचारी यांचा त्वरीत निलंबन करावी.
- 6) नागपूर येथे सुध्दा सकल हिंदू समाज तर्फे व्हेरायटी चौक येथे मोर्चा व निदर्शने केली होती. त्यामध्ये बौध्द धम्माचा पंचशील ध्वज तसेच अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाचा गैरवापर केला गेला. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या. तसेच हिंदू आणि बौध्द धर्माच्या लोकांमध्ये धार्मिक व जातिय तेढ निर्माण करण्याकरीता दोन्ही ध्वजाचा गैरवापर केला. त्या विरूध्द गुन्हे नोंद करून आयोजकां विरूध्द कार्यवाही करावी.
- 7) दिनांक 17 डिसेंबर रोजी संसदेमध्ये गृहमंत्री अमीत शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केला त्याचा प्रचंड रोष भारतातील संविधान प्रेमी जनता व्यक्त करीत आहेत. भारतातील तमाम समाज जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला दैवत मानतो. त्यांच्यामध्ये रोष असून केंद्र सरकारने त्वरीत गृहमंत्री अमीत शाह यांचा राजीनामा घ्यावा.
महिला आयोग, एससी, एसटी आयोग, मानव अधिकार आयोग यांचा जो अहवाल येईल, त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय. जी आणि एस.पी यांनी त्यांना खरी माहिती दिली का ? याचा त्यांनी तपास करावा आणि योग्य कारवाई करावी, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये तथ्य आहे. ते माझ्या संपर्कात होते. त्यांना विनंती केली की, 14 - 15 वर्षांच्या मुली पकडण्यात आल्या त्यांना सोडण्यात यावं, पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार तत्काळ थांबवावा आणि कोंबिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवावं. देवेंद्र फडणवीस आणि आय.जी यांच्याशी माझा कॉन्फरन्स कॉल झाला. आय.जी ने यामध्ये लक्ष घालतो असे म्हटले. आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, आय.जी आणि एस.पी यांनी सांगितले की, कॉम्बिंग ऑपरेशन झाले नाही. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरे तोडण्यात आली आहेत, घरात घुसून मारण्यात आले आहे. एका सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला सुद्धा मारण्यात आलेले आहे. अशा सर्व घटनांची चौकशी ही आय. जी आणि एस.पी नाही, तर इतर कमिटी मार्फत करावी आणि पीडितांना नुकसान भरपाई द्यावी - ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष: वंचित बहुजन आघाडी
0 टिप्पण्या