"भारतीय प्रजासत्ताक राष्ट्राच्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरिकांना जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान देऊन देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना समान हक्क व अधिकार मिळवून दिला परंतु परभणी येथे एका व्यक्तीने संविधानाची विटंबना केली ज्याचा जागतिक स्तरावर आंबेडकरी विचारधारेच्या नागरिकांद्वारे जोरदार निषेध करण्यात येत आहे, परंतु शासनाच्या दडपशाहीमुळे पोलीस यंत्रणेने निषेध करणाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना जेलमध्ये बंद केले आहे त्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत बळी गेला, तरी सरकार मात्र निषेध करणाऱ्यांना दोषी आणि संविधानाचा अपमान करून राजद्रोह करणाऱ्या आरोपीस तो मानसिक आजाराने त्रस्त आहे म्हणून त्याने असे कृत्य केले असे सांगून त्याची पाठराखण करीत आहेत म्हणून संविधानाची मोडतोड करणारा वेडा नसून त्याची पाठराखण करणारे वेडे आहेत" असे जळजळीत उद्गार सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९७ व्या मनुस्मृती दहन दिनाच्या प्रसंगी महाड येथे काढले.
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मनुस्मृती दहन व महिला मुक्ती दिन या संयुक्त कार्यक्रमाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते, सदर प्रसंगी आनंदराज आंबेडकर व मनिषाताई आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले, तसेच भन्ते महेंद्र थेरो यांनी अत्यंत सुमधुर आवाजात धार्मिक पूजापाठ केले, सरचिटणीस राजेश घाडगे यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कर्नाटक मधील डॉ. सरस्वती आणि धम्मसांगिनी यांनी कर्नाटकी भीमगीतांचा सुंदर कार्यक्रम सादर करून उपस्थितीतांमध्ये नवचैतन्य निर्माण केले, परभणी मधील डॉ. प्रमिलाताई लीला संपत या गेली २९ वर्षे महाड क्रांतिभूमीत हजारो महिलांना घेऊन येतात व महिला मुक्त दिन व मानव मुक्ती दिन सादर करतात त्यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले तसेच छत्रपती संभाजीनगर मधील अभिनेत्री सत्यभामा सौदमळ यांनीही आपले विचार व्यक्त केले आनंदराव आंबेडकरांनी या तिघींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, तद्नंतर माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनीही आपले विचार व्यक्त केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, चिटणीस श्रीधर साळवी, लवेश तांबे, यशवंत कदम, अनंत कदम, भगवान तांबे, अनिरुद्ध जाधव, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अरुण गमरे, विलास जाधव, सुशीलताई जाधव, अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, मंगेश गायकवाड, गजानन तांबे, निवडणूक समितीचे अध्यक्ष मिलिंद जाधव, अशोक जाधव व सखाराम जाधव (महाड तालुका), दगडू गमरे (पोलादपूर), रवींद्र मोरे (माणगाव तालूका), श्रीपाल कवाडे (श्रीवर्धन), एडव्होकेट प्रमोद कांबळे (पेण तालुका), प्रकाश येलवे (मुरुड), विजय गायकवाड (पनवेल तालुका), गजानन साळवी (म्हसळा तालुका), अनंत मोरे (तळा तालुका), निल मोहिते (सुधागड तालुका), विष्णू मोरे (अलिबाग तालुका), संजय जाधव, प्रकाश कांबळे (उरण तालुका), प्रकाश पवार व सुहास कांबळे (रत्नागिरी तालुका), विकास शिंदे (रोहा तालुका) दिलीप कासारे (दापोली तालुका), दीपक जाधव (संगमेश्वर तालुका), विजय तांबे, महेंद्र गायकवाड आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात "लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांना भावनिक करून त्यांची मत आपल्या बाजूने वळवून घेतली त्यामुळे आज राज्यात अनेक अत्याचार, दंगल असे प्रकार घडत आहेत तरी सर्वांनी यावर आत्मपरीक्षण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदान या अमूल्य अधिकाराचा योग्य तो वापर केला पाहिजे, तसेच तीन वर्षानंतर मनुस्मृती दहन दिनाचे शताब्दी वर्षे येणार आहे तेव्हा समाजातील दरी दूर करून घराघरात, गावागावात, तालुका तालुक्यात, जिल्हा जिल्ह्यात आणि संपूर्ण देशात सर्व समाजच संघटन होऊन सर्व समाज एकसंघ झाला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन मनुस्मृती दहन शताब्दी वर्ष साजरे केले पाहिजे" असे प्रतिपादन केले. उपसभापती विनोद मोरे यांनी ही डॉ. बाबासाहेब ते बाळासाहेब, भीमराव आणि आनंदराज असा तीन पिढ्यांचा इतिहास मांडताना या तीन पिढ्यांच्या कार्याचा आढावा घेतला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क दिला त्याची माहिती देत महामानवास विनम्र अभिवादन केले. शेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
0 टिप्पण्या