Top Post Ad

महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर..... पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री

  • गडचिरोली : देवेंद्र फडणवीस..,.आशिष जयस्वाल
  • ठाणे :एकनाथ शिंदे
  • मुंबई शहर :एकनाथ शिंदे
  • पुणे :अजित पवार
  • बीड :अजित पवार
  • नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे
  • अमरावती :चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे पाटील
  • वाशिम :हसन मुश्रीफ
  • रायगड :आदिती तटकरे
  • सातारा :शंभूराज देसाई
  • लातूर :शिवेंद्रसिंह भोसले
  • नंदुरबार :माणिकराव कोकाटे
  • सोलापूर :जयकुमार गोरे
  • हिंगोली :नरहरी झिरवाळ
  • भंडारा :संजय सावकारे
  • छत्रपती संभाजीनगरः संजय शिरसाट
  • धाराशिव :प्रताप सरनाईक
  • बुलढाणा : मकरंद जाधव
  • मुंबई उपनगर :आशिष शेलार...मंगलप्रभात लोढा
  • कोल्हापूर : प्रकाश आबिटकर...माधुरी मिसाळ
  • परभणी :मेघना साकोरे-बोर्डीकर
  • वर्धा :पंकज भोयर
  • गोंदिया :बाबासाहेब पाटील
  • सिंधुदुर्ग :नितेश राणे
  • अकोला :आकाश फुंडकर
  • नाशिक : गिरीश महाजन
  • सांगली : चंद्रकांत पाटील
  • पालघर : गणेश नाईक
  • जळगाव :गुलाबराव पाटील
  • यवतमाळ :संजय राठोड
  • रत्नागिरी :उदय सामंत
  • धुळे :जयकुमार रावल
  • जालना :पंकजा मुंडे
  • नांदेड : अतुल सावे
  • चंद्रपूर :अशोक उईके


जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा मक्ता (ठेका)पालकमंत्री कडे असतो. एक मंत्री पालकमंत्री बनला किंवा बनवला तर एका  वर्षात कमीतकमी दोनशे कोटी कमवू शकतो. असे आजपर्यंतचे आकडे सांगतात. जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजे निधी वाटपाचे दुकान असते. जळगावला पंधरा टक्के द्या आणि निधी घ्या.तो निधी कामासाठी वापरा किंवा नका वापरू, कोणी विचारणार नाही.ही हमी पालकमंत्री घेतो. धुळे येथे हाच दर पंचवीस टक्के होता.असा दर प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा असतो. बिचाऱ्या करदाता आणि मतदाताला हे माहितही नसते.माझा कर कसा चोरी होतो‌? माझा आमदार कशी चोरी करतो?

   या भ्रष्टाचारात पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदारांना सहभागी करून घेतो. कलेक्टर हा या भ्रष्टाचाऱी समीतीचा सचिव असतो. त्याच्याच सहीने हा निधी ट्रेझरी मधून बाहेर पडतो. याना अडवणारा कलेक्टर अजूनतरी कोणत्याही मातेने  जन्माला घातला नाही. कोणत्याही बापाने चांगला संस्कार केला नाही. याच्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते. अनेक बावळट नागरिक ठेवणीतील कपडे इस्तरी करून घालून हजेरी लावतात. त्याबद्दल त्यांना एक चॉकलेट दिले जाते. जेणेकरून पालकमंत्रीचे भाषण संपताच टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवून आपण गब्बरसिंगला रामगड लुटण्यासाठी सम्मती प्रदान करतो. यात अधिकतम रिटायर मिलीटरीमन असतात.त्याला एक्स सर्व्हिसमन म्हणतात. तो जरी चीन पाकिस्तान मधील शत्रूला गोळी घालत होता. पण येथे फक्त टाळी वाजवतो. देशांतर्गत शत्रूला गोळी घालत नाही. तो क्रांतीवीर मधील राजकुमार किंवा नाना पाटेकरचा रोल करीत नाही.

    आता कळले पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री का रूसवे फुगवे करीत आहेत? नसेल कळले तर माजी पालकमंत्री सतीश पाटील किंवा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना भेटून सर्विस्तर माहिती घ्यावी. एकनाथ खडसेंना सुद्धा याबाबत इत्यंभूत माहिती आहे. पण त्यांना अजूनही पालकमंत्री बनण्याची अपेक्षा आहे. सतीष पाटील आणि गुलाबराव देवकर यांना तशी भविष्यात संधी नाही. म्हणून ते प्रामाणिकपणे सांगतील.अशी मला अपेक्षा आहे. शेवटी शेवटी तर रावण सुद्धा सत्य सांगून जातो.कि मला रामाच्या हातून मरण पाहिजे होते म्हणून मी सीतेला पळवून नेले होते.तर यांनी पण सांगितले तर खूप उपकार होतील.  महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस उठसूठ छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेतो.स्वताला मराठा मराठा म्हणून मिरवतो.पण येथे मराठी बाणा हरवलेला दिसतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा वेळा नांव घेतात तर एकदा तरी त्यांच्यासारखा मराठी बाणा दाखवला पाहिजे.

   मला माझे साथीदार सांगतात.तुम्ही एखाद्या पक्षात जाऊन निवडणूक लढवली तरच विजयी होणार.मी म्हणतो, मी भारतातील कोणत्याही पक्षात जायला तयार आहे. पण मला कोणी घेत नाही. म्हणे तुम्ही आपल्याच पक्षातील आमदार खासदार मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्रीला भ्रष्टाचार करू देणार नाहीत.कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणीच आमदार खासदार मंत्री नगरसेवक निवडणूक लढत नाहीत. भ्रष्टाचार हाच तर राजकीय पक्षांचा मेन अजेंडा असतो. मग तो पक्ष मोदींचा असो किंवा पवारांचा किंवा ठाकरेंचा किंवा राहुल गांधींचा.खात्री करण्यासाठी  आमदार खासदार मंत्रींची संपत्ती मोजून पहा. जळगाव जिल्ह्यातील एक राजकीय कार्यकर्ता व्हिडिओवर म्हणाला होता कि, जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला होता. हा व्हिडिओ इंग्लंड मधे सुद्धा पाहिला.पण यातील पुर्ण सत्य हे आहे कि,एकिकडे पैशांचा पाऊस होता तर दुसरीकडे पैशांचा फव्वारा होता. नेते, कार्यकर्ते , मतदार यात न्हाऊन निघाले.

  • शिवराम पाटील ....९२७०९६३१२२
  • महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com