Top Post Ad

ठाण्यात प्रथमच २० ते २२ डिसेंबर गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन

 ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासातील विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा त्याचबरोबर, मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  २० ते २२ डिसेंबर या कालावधीत ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच महाअधिवेशन होणार असून, यापूर्वी जून महिन्यात होणार होते. मात्र, कोकण पदवीधर निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. सुमारे १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असुन यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ३४ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने आजवर गृहनिर्माण संस्थांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडून त्यांचे निरसन केले आहे. तरीही गृहनिर्माण संस्थांसाठी मोठया प्रमाणात कायद्यात तसेच नियम व उपविधीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित केल्याचे सांगितले.  ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, गृहनिर्माण मंत्री आदींसह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त असे अनेक मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत. तसेच अधिवेशनातील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी, अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या आणि स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्यात सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच, अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्था संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील अधिवेशनात पारित केले जाणार आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनने https://bit.ly/thanehousingmahaadhiveshan2024 ही लिंक उपलब्ध केली आहे. १५ डिसेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com