परभणी येथील घटनेचा निषेधार्य करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हिंसक वळण लावल्याची निदर्शनास येत आहे, मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो, पोलीस प्रशासनाने नकली ड्रामा करून लाठी मारण्याची भीती दाखवली व संतापलेल्या आंबेडकरी अनुयायी यांना जाणून बुजून खीजवले. मग संतापलेला आंबेडकरी समाज आक्रमक झाला, आणि तेथून या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आणि ठरल्याप्रमाणे संबंधित पोलीस प्रशासन अधिकारी यांनी घरात घुसून घुसून आंबेडकरी अनुयायी संविधान प्रेमींना बाहेर काढून कोम्बिग ऑपरेशन केले, त्या दिवशी हिंदू बचाव आंदोलन होतं म्हणून 10 डिसेंबर रोजीचा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यालय येथील सीसीटीव्ही फुटेज तपासावा. आणि सखोल चौकशी करून संबंधित संघटना पक्ष व हिंदू बचाव आंदोलनकर्ते यातील सर्व पदाधिकारी यांची चौकशी करून व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
सदरची घटना माननीय जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर घडलेली आहे तसेच सत्र न्यायालय देखील आहे अर्थात न्याय जेथे भेटतो त्यांचं न्यायालय आहे हे लक्षात घेता संबंधित इसम कोणत्या संघटनेचा आहे. त्याचा मास्टर माईन्ड कोण याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. ही घटना जाणिवपूर्वक घडवण्यात आली असल्याचा यात संशय येतो. त्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित जिल्हा प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी. या प्रकरणाच्या आडून परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेवर जाणिवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. येत्या आठ दिवसात जर कारवाई करण्यात आली नाही तर २२ डिसेंबर रोजी विविध संघटनांच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देणार आहोत. तसेच या आंदोलनामध्ये काही नुकसान भरपाई झाल्यास संबंधित स्थानिक पोलीस प्रशासन व शासन व सरकार जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी असे आवाहन युवा भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.--------------------------------------------------------------
परभणी प्रकरणी धारावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांना विविध संस्थांकडून निवेदन
------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या