Top Post Ad

यासाठी सर्व इंग्रजी शाळा संचालक मेस्टाच्या माध्यमातून आंदोलन करणार - सजंयराव तायडे

मागील दहा वर्षापासून थकीत असलेला राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत RTE शुल्क परतावा त्वरीत देण्यात यावा. राज्यातील अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करून त्या त्वरित बंद करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांकरिता लवकरच सर्व इंग्रजी शाळा संचालक मेस्टाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचा इशारा आज ९ जानेवारी रोजी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना दिला. यावेळी संघटनेचे महासचिव डॉ विनोद कुलकर्णी, विधी सल्लागार ऍड. सुधीर महाले, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील पालवे, ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा सचिव नरेश कोंडा, आदीं उपस्थिती होते. गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने आर टी ई शाळांमधे २५ टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात येणारे अडीच हजार कोटी अद्याप दिले नाहीत. याबाबत वारंवार सरकारकडे मागणी करूनही सरकार जाणिवपूर्वक चालढकल करीत असल्याचा आरोपही तायडे यांनी केला. 

  राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत RTE शुल्क परतावा त्वरीत देण्यात यावा. राज्यातील अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करून त्वरित बंद करण्यात याव्यात. नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा मान्यतेसाठी व दर्जावाढीसाठीचे निकष शिथिल करण्यात यावेत. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासनाच्यानामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लोकप्रतिनिधिंचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी. राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित करण्यात याव्यात. या आणि इतर मागण्यांबाबत सरकारवर दबाव टाकण्याकरिता लवकरच सर्व इंग्रजी शाळांचे एक अधिवेशन बोलावणार असून या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनासोबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला नाही, आमच्या मागण्या पुर्ण करण्यात आल्या नाही तर मग सर्व इंग्रजी शाळा चालकांचे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येईल असा इशारा तायडे यांनी दिला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com