Top Post Ad

क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले जयंतीमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका  क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांच्या १९५ व्या  जयंती निमित्त बहुजन महानायिका माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, माता भिमाई, त्यागमुर्ती माता रमाई यांचा  संयुक्त  जयंती उत्सव कार्यक्रम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठान (रजि.) यांच्या विद्यमाने नुकताच  नागरी निवारा सांस्कृतिककेंद्र हॉल, संकल्प, गोरेगाव पूर्व येथे संपन्न झाला.  


यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना पवार यांनी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून मंडळाच्या  चिटणीस ज्योती मोरे या होत्या. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन वीणा पवार आणि रुबी कांबळे  यांनी केले तर  डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ या प्रमुख वक्त्यांनी त्यांनी सावित्रीमाईचे महिलाप्रती कार्य व आजच्या सक्षम महिला या विषयावर उपस्थित  महिलांना मार्गदर्शन केले .यावेळी  उपस्थित महिला आणि मुलींची भाषणे झाली. तसेच कार्यकारणी सदस्या लता क्षीरसागर आणि सुमन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.  

शेवटी अल्पोहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम  यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठन कार्यकारणीतील सदस्य व महिला मंडळांनी विशेष मेहनत घेतली .



क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बहुजन विकास संघातर्फे ठाण्यात वाल्मिकी समाजातील महिलांचा सन्मान करण्यात आला. साठे वाडी येथे बहुजन विकास संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सोनी चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲड मीना बागडी,  सविता भगवाने,  रितुका बाल्मिकी, मनिषा चिंडालिया आदी महिलांना यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पुरूष कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  


  कार्यक्रमात “ स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने” ही प्रार्थना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सादर केली. व सत्यशोधक विचारांची कास धरून स्त्रियांना सक्षम करण्यासाठी समाजातील पुरूषांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.‌ या वेळी विविध महिला कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सावित्रीमाईं बद्ल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बिरपाल भाल,  नरेश भगवाने, नरेश बोहित यांचीही भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिलां सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात राजेश चिंडालिया , राम वाल्मिकी, दिनेश मेहरोल, अनिल वैद आदी ही उपस्थित होते.

***********

प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महीला असोशिएशन ह्याच्यां वतीने शुक्रवार दि.३/१/२०२५ रोजी सांय.ठिक ६-०० वा.खांबदेव मंदिर धारावी येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले ह्यांचा जयंतीमहोत्सव साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास माता क्रातिज्योती सावित्रिमाई ह्याच्या प्रतिमेस श्रीमती सावित्रीबाई हजारे ह्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच संस्थेच्या अध्यक्षा व बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण श्रीमती गौतमी जाधव व राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधानसभा अध्यक्ष उल्लेश गजाकोश ह्याच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

 


 क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले जयंती दिना निमित्त संस्थेच्या वतीने लाडु वाटप करण्यात आले क्रांतिज्योती सावित्रिमाई ह्याच्यां जीवनावरील प्रकाश टाकणारी माहीती सुकेशिनी महीला बचत गटाचे सचिव अपर्णा कासारे, संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन दिवेकर ,उल्लेश गजाकोश ह्यानी दिली.सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाश कदम, संजिवन जैयस्वाल,श्रीमती सुशिला सकपाळ,शोभा पिल्ले,श्रीमती जोगळे,श्रीमती फळसणकर,श्रीमती गंगुबाई शिंदे, अलिशा कासारे,कृष्णा गायकवाड,सुरेश शिदें,विनित कासारे,श्रीमती पोटे,एस.व्ही.मोहिते, आदि मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे ह्यानी केले.

*****************    

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

 

     क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनातील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           माजी महापौर. महादेव देवळे आणि महानगरपालिका सचिव श्रीमती रसिका देसाई आदी या प्रसंगी उपस्थित होते

************


    ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थ‍ित होते
================




   तेलंगाना सरकारने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने 3 जानेवारीला *महिला शिक्षिका दिवस* (Women Teacher's Day) घोषित करून दरवर्षी साजरे करण्याचा संकल्प केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com