सागर मांढरे नवी मुंबई कोपरखैरणे मध्ये राहतो. सध्या मी Airtel मध्ये इंजिनिअर आहे दि. ३०/१२/२०२३ रोजी मी 'Wifi Router Installation' साठी घणसोली मध्ये व्यंकटेशश्वर building मध्ये गेलो होतो. त्याच ठिकाणी एका Customer ची इंटरनेट बद्दल मला Complaint आली ती पाहण्यासाठी गेलो होतो. तो Customer IAS अधिकारी होता. त्याचा सोबत त्याचा घरामध्ये त्याचा भाऊ देखील होता, मी तपासणी केली असता इंटरनेट सुरळीत चालू असल्याची खात्री झाली परंतु IAS अधिकारी याला बेडरूम मध्ये रेंज मिळत नसल्याचे त्याने मला सांगितले मी त्याची देखील पाहणी केली, त्याला बेडरूम मध्ये त्याला रेंज नव्हती मिळत त्यावर मी त्याला सांगितले "तुमचे 4BHK घर आहे आणि hall मध्ये Router लावल्याने त्याची रेंज बेडरूम पर्यंत मिळण शक्य नाही."
0 टिप्पण्या