यावेळी उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केंद्राच्या संचालक डॉ. ममता मंगलानी, उपसंचालक डॉ. संतोष खुडे, ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. अंकित दवे, लार्सन अॅण्ड टुब्रो मधील सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभाग प्रमुख श्रीमती माबेल अब्राहम, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून 'होम अवे फ्रॉम होम’ या रूग्ण निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. इमारतीच्या दोन्ही मजल्यांवर असलेल्या रूग्ण निवासी खोल्या, स्वयंपाकघर, मुलांसाठी मनोरंजनाची साधने आणि इतर सर्व व्यवस्थांची देखील आयुक्त गगराणी यांनी पाहणी केली.
0 टिप्पण्या