मस्साजोग-जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निघृण हत्याप्रकरणी सर्व जातीधर्मीय व सर्वपक्षीय निषेध विराट महा जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा, मुंबई व सकल मराठा समाजाने केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जन आक्रोश आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. अतिशय अमानवीय पद्धतीने महाराष्ट्राच्या मातीला लाजवेल असा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि या निघृण प्रकरणातील सर्वच समाविष्ट आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कटात सामील प्रत्येकास आरोपी करावे व फाशी द्यावी आणि पीडितांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा. यासाठी २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान विराट महा जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते आणि मार्गदर्शक तसेच आयोजक यावेळी आपले विचार व्यक्त करतील. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप आझाद मैदान येथे होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे चंद्रकांत भोसले. Adv. सुभाष सुर्वे. सूर्याजी सोनवले. रामचंद्र शेडगे, गणपत गाडे, अनिल सुर्वे, बंडू लोंढे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
हा मोर्चा कोणत्याही समाजा विरुद्ध किंवा एखाद्या समुदाया विरुद्ध किंवा कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध आहे, याचा सर्वच स्तरांतून निषेध होणे गरजेचे आहे. कारण हा पुरोगामी महाराष्ट्र शिवछत्रपतीं, शाहू, फुले, आंबेडकर आणि साधुसंतांचा पुण्य भूमीचा असून, 18 पगड जाती बारा बलुतेदार एकत्र घेऊन चालणारा आहे. या दोन्ही घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे आणि अशा प्रवृत्तींना कायमस्वरूपीचा आळा बसावा. या मोर्चात सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा बरोबरच विवीध सामाजिक संघटना व विविध आठरा पगड जाती-धर्माच्या संघटना मोठ्या ताकतीने सहभागी होतील, असा विश्वास मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी व्यक्त केला.देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील विवीध वॉर्डा मध्ये जनजागृती व तयारीसाठी विवीध ठिकाणी बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विवीध समाज बांधव मोर्चासाठी येणार आहेत. त्यामुळे सर्व जातीधर्मीय लोक हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होतील. तसेच या मोर्चामध्ये स्व. संतोष देशमुख यांचे पिडीत कुटुंब आणि स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांचे पिडीत कुटुंब उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर सर्वपक्षीय पक्षप्रमुखांना निमंत्रित केले असून सवर्वांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन उपस्थित राहण्याचे शब्द दिलेला आहे. मोर्चा सर्व जातीधर्मीय, सर्व पक्षीय असेल. यामध्ये महिला पुरुष मुले मुली ज्यांना शक्य आहे ते निषेधासाठी काळी साडी, टी शर्ट, कुर्ता, शर्ट, काळी टोपी आदी परीधान करतील. प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे निवेदन तज्ञ व्यक्ती तयार करणार असुन ते सादर करण्यासाठी महीला-अभ्यासू समाज बांधव प्रशासनाकडे जातील. अशी अचार संहिता न्याय हक्क विराट महा जनआक्रोश मोर्चाच्या आयोजकांकडून ठरवण्यात आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या कथित अत्याचारास जबाबदार व दोषी असलेले सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सदर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात खुनाचे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मे २०२२ ते १५ डिसेंबर २०२४ ह्या काळात झालेल्या सर्व गुन्हे दाखल असताना वाल्मिक कराडला पोलीस संरक्षण कोणत्या कायद्यात सुरु ठेवले होते? वाल्मिक कराड, विष्णू चाटे तसेच त्यांच्यावर सध्या दाखल झालेल्या संघटित गुन्हेगारी खटल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक जवळचे मित्र मंडळी आणि त्यांच्या सर्व सहकारी, कार्यकर्ते, कर्मचारी यांच्या गेल्या १० वर्षापासून मोबाईल फोनवरचे डिटेल तसेच गेल्या दोन वर्षापासून संभाषण व सीडीआर संबंधित माहिती गोळा करणे तसेच वर नमूद केलेल्या सर्व व्यक्ती व त्यांच्या नावावर असलेल्या सर्व स्थावर-जंगम मालमता, बैंक खाती संपती यांचे डिटेल घेऊन व त्यावरील सर्व व्यवहार तात्काळ गोठवणे व ह्या सर्व संपत्ती जप्त करणे आणि सर्व आरोपीवर ईडी मार्फत "पीएमएल कायदा" अंतर्गत कारवाई करण्यात यावी व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व दोषी आरोपविर कडक शासन करावे व फाशीची शिक्षा करावी. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी.वरील नमूद सर्व आरोपी जे आवादा कंपनीचे खंडणी प्रकरण उघडकीस आले आहे त सर्व आरोपी आरोपी हे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी करून त्यांना मोक्का अंतर्गत गंभीर आशा खंडणी खुनाचे साखळी अंतर्गत गुन्ह्याचा तपास जलदगती करून तो खटला जलदगती न्यायालयात सुरु करण्यात यावा. गेल्या दोन वर्षापासून आजपर्यंत वरील सर्व आरोपी यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत केली हलगर्जी पणा केला वेळोवेळी टाळाटाळ केली कर्तव्यात कसूर केली अशा सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी सरकारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार निवारण समिती मार्फत चौकशी करून नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली खंडणी अटक करण्यात आलेल्या वरीलनमुद सर्व आरोपींचे मंत्री धनंजय मुंडेंचा घनिष्ट संबंध असल्याचे स्वतः सांगत आहेत असे असताना देखील त्यांनी नैतिकतेच्या कारणावरून गुन्ह्यातील तपास निष्पक्ष होईपर्यंत तसेच चौकशी होईपर्यंत तात्काळ राजीनामा दद्यावा व जर धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर तो राजीनामा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ घ्यावा महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे जनभावनेचा आदर करावा व वरील सर्व नैसर्गिक न्याय मागण्यांचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावे. अशा मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनास देण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या