भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत असतानाच संविधानावर घाला घातला गेला. याविरोधात संविधानप्रेमी जनता आंदोलन करीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थ्यांला मारहाण झाली व वैद्यकीय उपचारादरम्यान दिनांक 15 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. अनेक कार्यकर्त्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंदवले गेले. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारणाची अद्याप सखोल चौकशी न करता शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढण्यात आला आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. त्यांच्यावर सतोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे. आरएसएसच्या विचारधारेवर चालणारे न्यायमूर्ती अचलिया या प्रकरणाचा निपक्ष अहवाल देणे शक्य नाही. प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही तकलादू एक सदस्यीय समिती तात्काळ बरखास्त करावी. परभणी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्यावतीने एक फाइंडिंग टीम तथ्य अन्वेषण करण्यासाठी पाठवावी यांनी स्वतंत्र मूल्य निर्धारित करून आपल्या स्तरावर संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना प्रकरण, त्यानंतर उसळलेल्या आंदोलनाबाबत, पोलिसांनी केलेली अतिरेकी कारवाईबाबत व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू याबाबतची स्वतंत्र चौकशी करून अहवाल शासनास पाठवून हा अहवाल जनतेसाठी खुला प्रकाशित करावा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत असणाऱ्या राज्यस्तरीय व उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समितीची पुनर्रचना करून तात्काळ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे बैठक बोलावून अॅट्रॉसिटी अॅक्ट च्या अंमलबजावणीसाठी संबंधितांना आदेशित करावे. अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात येत आहेत.
0 टिप्पण्या