Top Post Ad

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित 'संन्यस्त ज्वालामुखी'चे १२ जानेवारीला होणार प्रकाशन

*ठाणे (गुरुवार, ०९ जानेवारी २०२५) :* ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित 'संन्यस्त ज्वालामुखी' ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावरील चरित्रकादंबरी लवकरच वाचकभेटीला येत असून रविवारी, १२ जानेवारी रोजी या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी थिएटर) येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यात 'संन्यस्त ज्वालामुखी'चे लोकार्पण करण्यात येणार आहे. 


   स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी जीवनकार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी 'संन्यस्त ज्वालामुखी' ही चरित्रकादंबरी लिहिली आहे. रविवारी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चरित्रकादंबरीचे प्रकाशन होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी व शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, साहित्यिक अशोक समेळ, प्रा. अशोक बागवे, किशोर कदम (सौमित्र), प्रा. प्रवीण दवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com