भारताचा इतिहास पाहिला तर असे आढळुन येते की, "भारत ये भूमि बुध्द की भुमि है !" शांती का प्रतिक है। ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित आहे. असे जरी असले तरी काही धर्मांध सत्ताधारी लोकांनी आपल्या स्वार्थीपणामुळे ज्या ठिकाणी पुज्य तथागत बुध्दांना "ज्ञान प्राप्ती" झाली ते बिहार राज्यातील बोधगया महाविहारावर कब्जा करून बसले आहेत. या कर्मठांकडून वारंवार बौद्ध धर्माचा अवमान करण्यात येत आहे. बोधगया विहार कमिटीच्या ट्रस्टीपदावर असल्याने ते सातत्याने या कायदयाचा दुरुपयोग करत आहेत. या ठिकाणी इतर कर्मकांड करुन बौध्द धम्माला बदनाम करण्याच्या हेतुने वाटचाल केली जात आहे. येथील कर्मकांड लोक बौद्ध धर्माला सातत्याने अडचणीत आणण्यांचे प्रयत्न सत्तेच्या जोरावर करत आहेत. कायदंयाच्या माध्यमातुन मुळ बौध्द धर्माच्या प्रचार व प्रसाराकरीता हेतुपुरस्पर बौध्द धर्माचे प्रचारकांवर बंदी घातली जात आहे. बिहार येथील बोधगया महाविहारांवर देखील हिंदु पंडीत देवस्थानांच्या ट्रस्टी व विश्वस्त पदावर राहून बौध्दधर्माचा अवमान करत आहे. हा अवमान त्वरीत थांबावावा ! हे महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे. बोधगया महाविहाराचे व्यवस्थापन केवळ बौद्धांकडेच असावे. बोधगया बी.टी.अॅक्ट 1949 हा पुर्णपणे रद्द करावा या मागणीकरिता मागील अनेक वर्षापासून आंदोलने होत आहेत. मात्र एखादा आंदोलनाचा टप्पा संपला की पुन्हा दुसरे आंदोलन उभे राहण्यास बराच वर्षाचा कालावधी जात आहे.
अनागारिक धम्मपाल यानी सुरु केलेले हे आंदोलन नंतर भदन्त सुरेई ससाई यांनी पुन्हा हाती घेतले. त्यानंतर आता संपूर्ण भिक्खू संघ या आंदोलनात उतरला आहे. १२ फेब्रुवारी पासून उपोषण आंदोलन आणि त्यानंतर आता धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र याकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही. ना बिहार राज्य सरकार, ना केंद्र सरकार. या आंदोलनाला आता जगभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. भारतातील सर्वसामान्य उपासक वर्ग देखील या आंदोलनात आपला सक्रीय सहभाग नोंदवत आहे. प्रत्येक संघ, संघटना आपआपल्या परीने हे या आंदोलन करीत आहेत. मात्र याकडे सत्ताधारी तर लक्ष देत नाहीत कारण ते इतर समाजाचे आहेत. परंतु बौद्ध समाजातील तथाकथित नेते जे सत्तेचा उपभोग घेत आहेत ते ही या आंदोलनाकडे जाणिवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता सोशल माध्यमांवरून जोरदार आवाज उठू लागला आहे. विद्यमान खासदार मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, ते बौद्ध समाजाचे असल्याने त्यांनी याबाबत संसदेत आवाज उठवायला हवा. मात्र ते मृग गिळून गप्प बसले आहेत. त्यांच्या आकानी त्यांनी तशी ताकीद दिली आहे की काय असा संशय आता येऊ लागला आहे. या अशा घातक प्रवृत्तीमुळेच आजपर्यंत बौद्धांवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आले असल्याची खंत भदन्त विशूद्धानंदबोधि यांनी व्यक्त केली.जाहीर सभेतून मोठ मोठ्या घोषणा द्यायच्या, बौद्धांचे नेते आहोत म्हणून भावनिक करायचे आणि बौद्ध समाजासाठी मात्र काहीही करायचे नाही, असा आजवरचा इतिहास आहे. बौद्धांच्या धम्म परिषदा, धम्म संमेलनामधून बौद्ध असल्याचा टेंभा मिरवणारे हे महाभाग आज बौद्धांच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर गप्प का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तिकडे भिक्खू संघ भर उन्हात आंदोलनाला बसला आहे. हे नेते मात्र ए.सी.गाडीतून फिरत आहेत. यांना समाजाशी कोणते देणे-घेणे आहे. अनेक भिक्खू आजारी पडले आहेत. अशक्तपणामुळे अनेकांची तब्येत खालावली आहे. मात्र या तथाकथिक बौद्ध नेत्यांना याचे कोणतेही सोयरसूतक नाही. आंदोलनाला कोणतीही मदत करणे दूरच त्या आंदोलनाकडे फिरकण्याचीही तसदी ही नेते मंडळी घेत नाहीत. मग यांना बौद्ध समाजाशी काय देणे घेणे असा प्रश्न भन्ते विशूद्धानंदबोधि यांनी केला.
खरे तर महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन कोणतीही नविन मागणी करत नाही. जो जुना कायदा आहे त्याला रद्द करण्याची साधी सरळ मागणी. सर्व जुने कायदे मोडीत निघाले मग हाच कायदा का कायम ठेवण्यात येत आहे. प्रत्येक प्रार्थनास्थळावर त्या त्या समाजाचे व्यवस्थापन असावे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. तोच अधिकार आज भिक्खू संघ मागत आहे. याबाबत संसदेला जाणिव करून देणे या बौद्ध खासदारांचे कर्तव्यच आहे. मात्र ते पार न पाडत असल्याने भिक्खू संघाला आंदोलन करावे लागत आहे ही तमाम भारतीय बौद्धांसाठी खरेतर अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मात्र आमचे तथाकथित नेते आप-आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलेलेच करत असल्याने त्यांना याबाबत कोणताही खेद वाटत नाही. किंवा तसे वाटून घेण्याची तसदी देखील ते करत नाहीत. यामुळेच आज भिक्खू संघाला तळपत्या उन्हात आंदोलनाला बसावे लागले आहे. अजून किती दिवस हे उन्हाचे चटके सहन करीत हे आंदोलन सुरू ठेवावे लागणार हे येणारा काळच ठरवले. मात्र अशा तकलादू नेत्यामुळे हा काळ वाढत जाणार हे मात्र निश्चित असल्याचे मत भदन्त विशुद्धानंद बोधि महाथेरो यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या