Top Post Ad

दलितांना जवळ करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर

 दलितांना आपलेसे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर आरएसएस करीत आहे. परंतु दुरान्वयेही तसा आरएसएसच्या विचारधारेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठलाही संबंध नसल्याचे अनेक दाखले डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी जाहीर सभेत मांडले. ते मूलभूत अधिकार संघर्ष समिती आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ऐनवेळी अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ती धुरा चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन यांच्याकडे आयोजकांनी सोपवली.


    आरएसएसतल्या लोकांशी डॉक्टर आंबेडकरांचा  खूप जवळचा संबंध होता; असे भासवण्याचा प्रयत्न  संघातील अनेक व्यक्ती करतात. परंतु ते खरे नसल्याचे म्हणत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी सभेमध्ये त्या मांडणीचे खंडन करणारे काही मुद्दे कागदपत्रे आधारे उपस्थितांसमोर विधान केले .पुणे येथे १९३८ मध्ये अचानकपणे एका निवडणुकीच्या कामानिमित्त गडकरी नावाच्या उमेदवाराकडे भेटीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले.आणि अचानकपणे तिथे हेडगेवार यांची भेट झाली .परंतु या भेटीचा हवाला देऊन आरएसएस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे खूप दृढ संबंध होते ;असे भासवले जाते. मात्र ते खरे नाही; असे म्हणत त्यावेळचा घटनांचा पट उपस्थित श्रोत्यांसमोर आनंद तेलतुंबडे यांनी मांडला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य,समता बंधुता धर्मनिरपेक्ष समाजवाद मारणारे होते. विविधता हा भारताचा गाभा आहे .त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्रवादाला नाकारले.तसेच भारतात अल्पसंख्याकांना दुय्यमत्व ही भूमिका आंबेडकरांनी नाकारली.याच्या उलट  समरसता या नावाने जातींमध्ये कोणताही भेदभाव नाही. त्यात वाईट काहीच नाही, असे आरएसएसकडून सांगितले जाते. १९४९या काळात गोळवलकर  हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः भेटायला गेले होते ही वस्तुस्थिती आहे.मात्र त्या भेटीचा हवाला देऊन  सांगितले जाते,की आरएसएसवरील बंदी उठवण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले,परंतु ते देखील खोटेच आहे; अशी भूमिका डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी मांडली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे सभागृह गर्दीने तुडुंब भरलेले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com