वांद्रे येथील जयशिवसाई गृहनिर्माण प्रकल्पातील धम्मचक्र मित्र मंडळाच्या वातानुकूलित नवीन बुद्धविहाराचे उद्घाटन आणि बुद्धमूर्ती स्थापना सोहळा सोमवारी भिख्खू आर्यज्योती थेरो यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वांद्रे (पूर्व) जयशिवसाई एसआरए गृहनिर्माण प्रकल्पातील साईकृपा सोसायटी धम्मचक्र मित्र मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ व रहिवाशी संघाच्या बुद्ध विहाराचे नूतनीकरण शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख कुणाल (बंटी) सरमळकर आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या निधीतून करण्यात आले. सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंतीचे औचित्य साधून या वातानुकूलित बुद्धविहाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन आणि नवीन बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, महिला विभागप्रमुख भक्ती भोसले व विकासक पंकज घाग आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धार्थनगर जयशिवसाई गृहनिर्माण प्रकल्पातील हे पहिलेच वातानुकूलित बुद्धविहार आहे. या विहारामुळे येथील बौद्ध बांधवांना ७० वर्षांनी हक्काचे विहार मिळाले आहे. पुनर्वसनात हे विहार असावे, या मागणीसाठी जयशिवसाई संस्थेच्या कार्यकारिणीनी आणि मंडळाने विकासक पंकज घाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून पुनर्वसन प्रकल्पात सुनियोजित असे बुद्धविहार बांधून देईन, असे आश्वासन विकासक पंकज घाग यांनी यावेळी उपस्थितांना दिले.या उद्घाटन सोहळ्यासाठी धम्मचक्र मित्र मंडळाचे कमलेश जगताप, प्रवीण मोरे, अजय गमरे, अश्विन सपकाळ आणि मनोज साखरे यांनी अथक परिश्रम घेतले.
वांदे पूर्व जयशिवसाई प्रकल्पात धम्मचक्र मित्र मंडळाच्या वातानुकूलित बुद्धविहाराच्या उद्घाटनात स्थानिक शिवसेना विभागप्रमुख कुणाल सळमळकर, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, महिला विभागप्रमुख भक्ती भोसले यांचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.
0 टिप्पण्या