1935 पासून कांबळी वाडीमध्ये स्ट्रक्चर अस्तित्वात आहे. BMC ने 1961 पूर्वीच्या सर्व स्ट्रक्चरना वैध मान्यता दिली आहे. 8 ऑगस्ट 2013 रोजी BMC च्या कायदे विभागाने हे स्ट्रक्चर कायदेशीर ठरवले होते. 1998 मध्ये जैन मंदिरासाठी हे स्ट्रक्चर भाड्याने घेतले गेले होते. आजही भाडे दिले जाते. लाईट आणि पाण्याचे बिल जैन मंदिर ट्रस्टच्या नावावर आहे. BMC आजतागायत पाण्याचे बिल ट्रस्टच्या नावाने देते. असे असतानाही महानगर पालिकेने हे स्ट्रक्चर अवैध ठरवत येथील जैन मंदिर जमिनदोस्त केले. 16 एप्रिल रोजी कोर्टात सुनावणी लिस्टेड होती आणि कोर्टचा स्टे ऑर्डरही लागू होता. तरीही पोलिसांच्या उपस्थितीत दिगंबर जैन मंदिरावर JCB ने केवळ काही मिनिटांत 16 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता कोर्ट सुरू होण्याआधीच कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आले. सद्यस्थितीत कोर्टात हा प्रकरण प्रलंबित असताना, 'K' वॉर्ड ईस्टचे अधिकारी नवनाथ घाडगे यांनी तातडीने ही ऑर्डर कोणाच्या आदेशाने दिली. असा सवाल आज अखिल भारतीय सकल जैन समाजाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. या पत्रकार परिषदेला मंदीरचे ट्रस्टी अनिल भाई शाह तसेच प्रवीण जैन, प्रियुष शाह, कुशल जैन, भरत बाफना, राजेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत गुरुवारी रात्री जैन समाजाची सभा घेण्यात आली. ज्यामध्ये मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. सभेत R K HOTEL (Vileparle East) यांचा हात असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे जैन समाज आक्रमक झाला असून जैन मंदिर पाडण्याच्या महापालिकेच्या या कारवाई विरोधात अहिंसक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 19 एप्रिल, सकाळी 9:30 वा. कांबळी वाडी, नेहरू रोड, R K HOTEL, तेजपाल रोड, हनुमान रोड, महात्मा गांधी रोड, साहजी राणे रोड, कोल डुंगरी, अंधेरी ईस्ट स्टेशन, अंधेरी कुर्ला रोड, 'K' वॉर्ड BMC कार्यालयापर्यंत ही रॅली मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर महापालिका कार्यालयात निवेदन दिले जाईल: ज्यामध्ये जबाबदार BMC अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. BMC ने आपल्याच खर्चाने नवीन मंदिर लवकरात लवकर बांधून द्यावे. या घटनेबद्दल BMC ने माफी मागावी अशा मागण्या करण्यात आल्या असल्याचे राजेश जैन यांनी सांगितले. मंत्री मंगलप्रभात लोढा व आमदार पराग अलवाणी या रॅलीत सक्रिय सहभागी असतील. मुंबईतील सर्व जैन व हिंदू समाजाने लाखोंच्या संख्येने या रॅलीत सहभाग नोंदवावा. सर्व जैन समाजाचे ट्रस्टी, मंडळे आणि संस्था या रॅलीत सहभागी होतील. यावेळी पांढरे कपडे व काळा बँडचा वापर करून महापालिकेचा निषेध करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.विले पार्ले ईस्ट येथील दिगंबर जैन मंदिर BMC ने JCB लावून जमीनदोस्त केल्या प्रकरणी शनिवार दि. 19 एप्रिल सकाळी 9:30 वाजता अहिंसक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत हजारो जैन बांधवासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाडही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
0 टिप्पण्या