ब्रिटिशकालीन रे रोड पुलाच्या पाडकाम झाल्यानंतर तीन वर्षात नव्यानेच निर्माण केलेल्या संत सावता फ्लायओव्हर पुलाच्या लोकार्पणाकरिता प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांना तसेच रेल्वे प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. उद्घाटनाअभावी रे रोड रेल्वे स्थानक गाठताना होत असलेल्या त्रासाला कंटाळून आता आम्हीच स्थानिक रहिवाशी या पूलाचे उद्घाटन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सलीम खतीब यांनी मुंबई महानगर पालिका, महारेल, मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड,एमएमआरआयडीसी आणि संबंधित प्रशासनास दिला आहे.
रे रोड येथील ब्रिटिशांनी बांधलेला पूल पालिका आणि संबंधित प्रशासनाने तोडला त्या नंतर कोरोना काळात म्हणजेच २०१९ - २० मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले. ते आजमितीस पूर्ण झाले असले तरी त्याचा लोकांना वाहतुकीस उपयोग होण्यासाठी सज्ज असतानाही तो होत नाही. तसेच चुकीच्या पद्धतीने हा पूल बांधल्यामुळे रेल्वे प्रवाश्यांना कायमचीच डोके दुःखी होणार आहे. डॉकयार्ड मार्गे कॉटन ग्रीन, शिवडी कडे जाताना रे रोड शेजारील पेट्रोल पंपाच्या काही मीटर पुढे हा पूल सुरु होतो. पूर्वी तो थेट रे रोड स्थानकाच्यावरील तिकीट खिडकी कार्यालयाकडे जात डावीकडे माझगाव, मुस्तफा बाजार, भायखळाकडे तर उजवीकडे वळण घेत ब्रिटानिया बिस्कीट कंपनी आणि डावीकडे वळत रेरोड हिंदू स्मशानभूमीकडे जात होता. आता मात्र रे रोड रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी जायचे झाल्यास भर उन्हापावसात प्रवाश्यांना मोठा वळसा मारून तिकीट खिडकीकडे जावे लागणार आहे .यां पुलावरून रे रोड स्टेशनवर जाण्यासाठी मध्यभागी भरपूर जागा असल्यामुळे तेथून थेट तिकीट खिडकीला मार्ग काढल्यास नागरिकांना फारच सोईचे ठरेल. मुस्लिम सुन्नी कब्रस्तानच्या डावीकडून माझगाव ब्रिटानिया कंपनी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय कडे जाणारा मार्ग आणि येथूनच सरळ माझगावकडे तसेच ब्रिटानिया पंपिंग स्टेशनकडे जाणारे मार्ग पुलाचे उद्घाटन रखडल्यामुळे बंदच आहेत. त्याचा प्रचंड त्रास स्थानिकांना तसेच बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना भोगावा लागत आहे रेल्वे प्रशासनाने पुलाच्या बांधकामाबद्दल काही आक्षेप घेतल्याची माहिती मिळत असून याबाबत माहिती देण्यास रेल्वे प्रशासन उत्सुक नाही अशी माहिती सलीम खतीब यांनी दिली.. रे रोडच्या दारुखाना आणि शिवडी परिसरातील जवळपास ६० ते ७० हजार लोकांना यां पुलाच्या उद्घाटन रखडल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारूखाना आणि शिवडी परिसरातल्या लोकांना माझंगांव, भायखळा, राणीबाग परिसरात जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा दुवा ठरतो मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड एमएमआरआयडीसी द्वारा हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे मात्र अयोग्य बांधकामामुळे उपयुक्त जागा असूनही पूल अरुंद झाला आहे एकीकडे नारळवाडी कब्रस्तान आहे तर दुसरीकडे रे रोड हिंदू स्मशानभूमी आहे.हिंदू धार्मियांना अंतिम विधिकारिता प्रेतयात्रा रेरोड स्मशानभूमीत नेताना मोठा वळसा मारून न्यावे लागणार आहे. मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड एमएमआरआयडीसी द्वारा हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे मात्र अयोग्य बांधकामामुळे उपयुक्त जागा असूनही पूल अरुंद झाला आहे, त्यातच तिकीट घर, खिडकी यांचे पूर्वीसारखे योग्य नियोजन नसल्याने लोकांना मोठा मनस्ताप भोगावा लागेल यात अभियंताच्या सर्वोत्तकृष्ट ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा अभाव असल्यामुळे हे असे नियोजन शून्य काम झाल्याचा आरोप सलीम खतीब यांनी केला आहे. दारुखाना येथे समुद्रकिनारी असलेल्या जुन्या बोटिंच्या, जहाज तोडकम उद्योग, तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या लोखंडी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होऊ लागला आहे. देशी विदेशी भंगारात खरेदी केलेल्या जहाज तोडण्याच्या उद्योजकांना माल वाहतुकीची सोय नसल्याने त्यांनाही मोठा वळसा घालून माल न्यावा लागतो. रे रोड रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर बेस्ट बस ने पुढील प्रवास करणाऱ्या महिला, मुली तसेच वरिष्ठ नागरिकांना रात्रीच्या अंधारात यां परिसरातुन जाताना जीव मुठीत धरून जावे लागते का या परिसरात भायखळा आणि शिवडी आणि पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त, निगराणी चौकी उभारली नसल्याने समाज कंटक आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या गर्दूल्याचे प्रमाण येथे वाढू लागले असल्याचे येथे सायंकाळी फेर फटका मारल्यास सहज नजरेसमोर येते. ब्रिटिशकालीन निर्मित रे रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग काढावाच लागेल, कारण तिकीट खिडकीकडे पूर्वी सहज जाता येत होते मात्र आता मोठा वळसा घालून जावे लागणार असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, महिला, गरोदर स्त्रिया, रुग्ण, दिव्यांग, वरिष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन कारवा लागणार आहे. या जाचापासून आताच सुटका झाल्यास उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात होणारा त्रास थांबेल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या