जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. पश्चिम बंगालमधील तीन पर्यटकांमध्ये एक आयटी व्यावसायिक, एक सरकारी कर्मचारी आणि गुप्तचर अधिकारी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे काम करणारा ४० वर्षीय आयटी व्यावसायिक बितन अधिकारी भारतात सुट्टीवर होता. कोलकात्याच्या वैष्णवघाटा भागातील रहिवासी असलेला तो त्याची पत्नी सोहिनी अधिकारी आणि तीन वर्षांच्या मुलासह काश्मीरमध्ये सुट्टीवर होता. तर हैदराबादमध्ये गुप्तचर विभागाचा अधिकारी असलेले मनीष रंजन हे वैष्णोदेवी मंदिराच्या यात्रेसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये असल्याचे वृत्त आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांना कंठस्नान घालावयासच हवे, मात्र त्याचबरोबर अन्य पुढील बाबीचा गांभीर्याने विचार करून त्याचाही सोक्षमोक्ष लावला पाहिजे.
- हल्ला झालेले ठिकाण हे काश्मीर बॉर्डरवर नसून इथून जवळपास साडेतीनशे किलोमीटर आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान आठ तास प्रवास करावा लागतो. मग अतिरेकी पहेलगाम पर्यंत पोहोचले कसे?
- बॉर्डर वरच्या व मार्गावरील सुरक्षा व्यवस्था लष्कर कोठे होते?
- सर्व अतिरेकी हे भारतीय लष्करी गणवेश परिधान करून होते त्यांना ते कोठून प्राप्त झाले?
- पहेलगामजवळ सुमारे अडीच हजार पर्यटक एकाचवेळी त्या भागात पर्यटन करत होते .मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा जवान त्या भागात तैनात का केला नव्हता?
- अतिरेक्यांकडून गोळीबारानंतर अर्धा तास उलटलातरी घटनास्थळी सुरक्षा रक्षक का पोहोचू शकले नाहीत?
- पुलवामा होऊन काही वर्षं झाली..आजही भारत देश या प्रश्नांच्या उत्तरांची वाट पहात आहे.
- ४५० किलो RDX हाय सिक्युरिटी एरीयात आले कसे?
- आज ,तिथून सैनीक जाणार आहेत अशी बातमी फुटली कशी?
- एअरलिफ्ट द्या कारण काही गुप्त बातम्यांनुसार हल्ला होण्याची शक्यता आहे असे कळऊन पण एअरलिफ्ट का नाकारली?
- हल्ल्याचे अतिरेकी कोण? सध्या कुठे आहेत?
आता पहलगाम वरून चे प्रश्न.
जिथे सर्व सिमा जंगल एरीयाजवळ संपतात आणि जेथून अतिरेकी लपायची शक्यता असते आणि सर्वात जास्त पर्यटक एकाच वेळी असतात तिथे साधी एखादी पोलीसचौकी,आर्मी यासारखी सुरक्षा व्यवस्था का नाही?
हे अतिरेकी कोण ? कुठुन आले? गायब कसे झाले?
सत्तावीस लोकांना मारेपर्यंत साधारण तीस मिनीटे तरी ते तेथे होते या तीस मिनीटात बातमी विविध स्त्रोतांमधून पोहचली कशी नाही.
समजा पोहचली असेल तर एखादा अतिरेकी सापडेपर्यंत सिक्युरिटी फोर्स तत्काळ पोहचली का नाही?
गुप्तचर खात्यांना पुसटशी सुद्धा कल्पना का नव्हती ?
हे गुप्तचर खात्याचे अपयश मानायचे का?
बातमी बाहेर येताचक्षणी , फक्त विशीष्ठ हेडींग संपूर्ण भारतात एकाचवेळी पब्लीश कशी झाली?
पुलवामा ला ऊत्तर ऊरी दिले गेले पण पुलवामा मधीलच आरोपी ऊरी मधे असतात आणि मारले कसे गेले? पहलगाम बाबत पण असेच काही होईल का?
श्रेय घ्यायच्या वेळी पुढे असणारे नेते यावेळी स्वतः चे फेल्यूअर कबूल करतील का? सर्वात महत्त्वाचे, भाजपचे जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल मलिक ऊघड काही आरोप करत असताना त्यांच्या एकाही आरोपाला सरकारने आजपर्यंत एकदाही ऊत्तर का दिले नाही. प्रश्न विचारणे एक भारतीय मतदार म्हणून कर्तव्य आहे. सतत पांघरूण घालणारे अंध भक्त देशद्रोही आहेत.
0 टिप्पण्या