प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान २०२५ अंतर्गत सहा विविध पुरस्कार वितरण समारंभ रविवार 27 एप्रिल 2025 यशवंत चव्हाण प्रतिष्ठान हॉल चर्चगेट येथे पार पडणार आहे. राज्यभरातुन प्रहार जनशक्ती पक्षाचे मजबूत संघटन उभे झालेले असल्याने या सन्मान सोहळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मागील २० वर्षात प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अखंड मेहनतीमुळे हे शक्य झाले असून, यात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान खूप मोलाचे आहे. अशा कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी "संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान - २०२५" राबविण्यात येत असल्याची भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांची आहे. सहा विविध क्षेत्रातील हे पुरस्कार तालुका, जिल्हा व विभागस्तरावर देण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्ष प्रवक्ते जितू दुधाने व मुंबई संपर्क अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन मुंबई व कोकण विभागीय मेळावा व संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण 'पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई येथे पार पडली. प्रहार जनशक्ती पक्ष प्रवक्ते जितू दुधाने व अभियान प्रमुख महेश बडे, तसेच अॅड. अजय तापकीर, मुंबई संपर्क अध्यक्ष, अॅड. मनोज टेकाडे, प्रदेश प्रवक्ता, हितेश जाधव पालघर अध्यक्ष, स्वप्नील पाटील ठाणे अध्यक्ष, आणि दिव्यांग क्रांती आंदोलनाचे मुंबई प्रभारी रामदास खोत, कोकण अध्यक्ष सुरेश मोकल, काजल ताई नाईक, कृष्णा शिंदे, मुंबई अध्यक्ष, जिवजीत विश्वकर्मा, मच्छिन्द्र जाधव, सुरेश चक्रे, बाळू केंजळे, चंद्रकांत उत्तेकर, प्रवीण खेडकर, रुद्रक्ष नागरगोजे, रमेश सरतापे, अजय कदम, यांच्यासह विविध विभागातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.या पुरस्कारासाठी फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता अर्ज करू शकणार होते. प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यात विभागून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पक्षीय संघटन अधिक मजबूत करणे, आपल्यात असणाऱ्या कलागुणांना वाव देणे, आपल्याकडून येणाऱ्या सूचना त्याची योग्य दखल घेऊन त्याची पक्ष वाढीसाठी विचार करणे यासाठी आपण संर्वांनी या पुरस्कार प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे म्हणून १९ फेब्रवारी रोजी पुरस्कारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि १० मार्च पर्यंत आपल्याला अर्जाची शेवटची तारीख होती. तसेच ऑफलाइन फॉर्म भरुन त्याबाबत आपण केलेल्या कामाचा कार्य अहवाल सोबत जोडणे बंधनकारक होता. फॉर्म वरती दिलेल्या सूचना वाचून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करण्याचे आवाहन ही अध्यक्ष बच्चूभाऊ यांनी केले होते.
महत्वाचे म्हणजे हा उपक्रम शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपण विशेष मोहीम राबवून पुरस्कार अर्ज त्यांच्या पर्यंत पोहचणे आवश्यक होते. या पुरस्कार प्रक्रियेत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना प्रोत्साहित करुन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करून राज्यभरातून हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते पुरस्कारासाठी अर्ज करावे असेही पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आवाहन केले होते.
. पत्रकार परिषद नंतर झालेल्या बैठकीत कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी सुसूत्र नियोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या कामकाजासाठी विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये अनुभवी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना ठराविक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत त्याचीही माहिती देण्यात आली. मीडिया समिती, सोशल मीडिया समिती, स्वागत समिती, नियोजन समिती, अल्पाहार व्यवस्था, मंच व्यवस्थापन, माध्यम व संपर्क समिती, नोंदणी व माहिती समिती, सत्कार समिती, स्टेज समिती, पार्किंग व्यवस्था समिती इत्यादी. या समित्यांचा समन्वय आणि सक्रिय सहभाग हा कार्यक्रमाच्या यशाचा मुख्य आधार ठरणार आहे, असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
0 टिप्पण्या