डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने 1 मे 2025 रोजी सायं.4:30 वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ,ठाणे ,पश्चिम येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या सहृदांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
2025 हे वर्ष प्रखर बुध्दिवादी व भविष्याचा समूचीत वेध घेणारे आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी कालकथीत डाॅ.म.ना. वानखडे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षीचा डाॅ.म.ना वानखडे पुरस्कार सुप्रसिद्ध स्रिवादी लेखिका कार्यकर्त्या शारदा साठे यांना देण्यात येणार असून क्रांतिकारी लेखक बाबुराव बागुल पुरस्कार, शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्तांच्या चळवळीत कार्यकर्ते धनाजी गुरव यांना तर प्राचार्य म.भी.चिटणीस पुरस्कार लोकशाहीवादी लेखिका दिवंगत शिरीष पै (मरणोत्तर)यांना देऊन गौरवण्यात येणार आहे.प्राचार्य डाॅ.प्रकाश खरात, प्रा.रामप्रसाद तौर आणि प्रा प्रकाश सिरसाट यांच्या निवड समितीने पूरस्कर्त्यांची निवड केली. या प्रसंगी प्रा.डाॅ.वंदना महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी जेष्ठ लेखक,कवी शिवा इंगोले असतील. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्य प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे सचीव नाना आहिरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या