Top Post Ad

वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजला नागरिकांचा विरोध... अधःसमुद्र बोगदा निर्माण करण्याची मागणी

 मुंबईतील अंधेरी या उपनगरात असलेल्या जुहू बीच पर्यटकांचे आकर्षण आहे. सुर्योदय पाहण्यासाठी सकाळच्या वेळेस हजारो नागरिक तसेच पर्यटक येतात. इतकेच नव्हे तर दिवसभरात या ठिकाणी फिरण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावत असतात. मात्र सरकारच्या वांद्रे-वर्सोवा कोस्टल लिंकच्या प्रकल्पामुळे इथले सर्व सौंदर्य नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे वांद्रे येथी बॅन्ड-स्टॅन्डचे सौंदर्य नष्ट झाले आणि तेथील पर्यटकांची संख्या मंदावली त्याचप्रमाणे भविष्यात जुहू बीच येथे होऊ शकते. यासाठी    जुहू बीच वाचवा या मोहिमेअंतर्गत  जुहू येथील नागरिक  उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता ,श्रीमती उषाबेन पटेल  यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रस्तावित वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजच्या विरोधात एकजूट दाखवली आहे. 

  पर्यावरणपूरक भूमिगत किंवा समुद्राखालील बोगद्याच्या पर्यायाचा पुनर्विचार करण्याची विनंती येथील अनेक नागरिकांनी केली आहे. यासाठी मागील काही वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत असून याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती. मात्र त्यावेळी हा प्रकल्प केवळ कागदावरच असल्याने न्यायालयाने या प्रकल्पाबाबत अधिक माहिती याचिकेमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता या प्रकल्पाला सुरुवात झाली असून आम्ही पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असल्याचे  डॉ. हिमांशू मेहता तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले. याबाबत सोशल  मिडिया आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने आज मुंबईतील प्रेस क्लब या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणीय नुकसान, सौंदर्याचा नाश आणि दीर्घकालीन शांततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारा आहे  याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. .या करिता तमाम जुहू बीच वर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारांना हस्तक्षेप करून वांद्रे-वर्सोवा कोस्टल लिंकसाठी पर्यावरणपूरक मार्ग सुचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  जुहू बीचचे सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी सर्व संबंधित नागरिकांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. या ओव्हरहेड ब्रिजमुळे जुहू बीचच्या सौंदर्याचे रहस्य निघून जाईल. ब्रिज बांधण्याऐवजी पर्यायी मार्ग किंवा समुद्राखालील बोगद्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे.  उच्च न्यायालयाने यापूर्वी अधिक कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती आणि काळजीपूर्वक तयारी केल्यानंतर, आता एक नवीन जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

  • भूमिगत बोगद्याचा पर्याय का आवश्यक आहे?
  • 1. जुहू समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य वाचवा – ओव्हरहेड ब्रिज हा कायमस्वरूपी कुरूपपणा निर्माण करेल आणि मुंबईतील एक सुंदर समुद्रकिनारा, जिथे दररोज ५-१० लाख लोक भेट देतात, त्याचे सौंदर्य नष्ट होईल.
  • 2. जागतिक सर्वोत्तम पद्धती – बॉस्टन, हाँगकाँग आणि टोकियोसारख्या शहरांनी उंच पायाभूत रचना काढून टाकून बोगद्याचा पर्याय निवडला आहे, ज्यामुळे टिकाव व सौंदर्य दोन्ही राखले गेले.
  • 3. व्यवहार्यता व खर्च–
  •    - दुबई-मुंबईदरम्यान १,२०० किमी लांबीचा बोगदा विचाराधीन आहे.
  •    - बांद्रा-वर्सोवा प्रकल्प फक्त ७ किमी आहे – अधिक व्यवहार्य व लहान प्रकल्प.
  •    - MMRDA अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार बोगद्याचा खर्च थोडाच अधिक आहे पण पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे.
  • 4. न्यायालयाचे प्रोत्साहन – नागरिकांच्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयाने व्यवस्थित दस्तऐवजीकरण करून याचिका दाखल करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सध्या ही याचिका पुन्हा सादर करण्यात आली आहे.
  • 5. पर्यायी मार्ग– ज्या पर्यायांचा पर्यावरणावर परिणाम कमी आहे, अशांचा विचार करणे गरजेचे आहे – उदा. अधःसमुद्र बोगदा.
  • 6. सार्वजनिक पायाभूत प्रकल्पांचा पुनर्विचार – जगभरात अशा अनेक प्रकल्पांचा पुनर्विचार व पुनर्रचना झाली आहे, जेव्हा ते जनहिताच्या विरुद्ध ठरले आहेत.

कृतीसाठी आवाहन- मुंबई व देशभरातील नागरिक महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला आवाहन करतात की त्यांनी या प्रकल्पाचा पर्यावरणपूरक व शाश्वत पर्याय निवडावा. जुहू समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य व परिसंस्थेचे संतुलन टिकवण्यासाठी ही अत्यावश्यक वेळ आहे.

  • मुव्हमेंटमध्ये सहभागी व्हा!
  • 1. #MakeJuhuBeachHeavenNotHell  
  • 2. #NoBridgeYesTunnel
  • "स्वर्ग वाचवा, भूमीखाली बांधा – पुलाला नकार, बोगद्याला होकार!"  
  • “जुहूचा क्षितिजरेखा मोकळा ठेवा — शहाणपणाची निवड करा, समुद्राखाली बोगदा करा!"
  • असे आवाहन आज पत्रकार परिषदेद्वारा करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com