Top Post Ad

हा लढा अस्तित्वाचा आहे, त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा

भदंत गौतमरत्न थेरो यांच्या नेतृत्वात ठाणे कोर्ट नाका येथे दहा दिवस साखळी उपोषणाची सुरुवात

ब्राम्हणांच्या ताब्यातून महाबोधि महाविहार मुक्त करण्यासाठी  संपूर्ण भारतभर तीव्र गतीने सुरू असलेले आंदोलन ठाणे जिह्यामध्ये व्यापक स्वरूपात राबवून तमाम बौध्दांचे न्यायिक मागणी केंद्र सरकार व बिहार सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी भदंत गौतमरत्न थेरो यांच्या नेतृत्वात ठाणे कोर्ट नाका येथे दहा दिवस साखळी उपोषणाची आज १६ एप्रिल रोजी सुरुवात झाली.  या आंदोलनात महिला वर्गाचा प्रामुख्याने विशेष सहभाग होता.   अखिल बौध्दांचे धार्मिक अधिकार हनन करण्याच्या हेतूने तत्कालीन केंद्र सरकार व बिहार सरकारने संगनमत करून 1949 साली बनवलेला काळा कानून बोधगया टेम्पल अॅक्ट संविधानानुसार त्वरित रद्द करावा.  बौध्द धर्मीयांचे सर्वोच्च श्रध्दास्थान महाबोधि महाविहाराचे संपूर्ण प्रबंधन बौध्दांच्या हाती द्यावे. या हक्काच्या मागणीसाठी नियोजित साखळी उपोषण आंदोलनाला ठाणे शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

  बोधगया महाविहार हे आपले अस्मिता आहे आपली विरासत आहे आपली ऐतिहासिक ओळख आहे बाबासाहेबांनी दिलेला हा शांतीचादुताचा मार्ग आहे आणि यामध्ये आपण महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडातून मुक्त करणं,  बुद्धाच्या वाणिने व वास्तव्याने समृद्ध झालेल्या या ऊर्जाभूमीसाठी शिस्तबद्धरीत्या लोकशाहीच्या मार्गाला शांतीतेच्या मार्गाने न्यायिक न्याय मिळावा म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात आंदोलन सुरू आहे.  म्हणून आपली जबाबदारी आहे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बुद्धाने जो शांतीचा धम्म आपल्याला दिलेला आहे त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला असणं फार आवश्यक आहे. म्हणून सर्व बौद्ध उपासकवर्गाने या  साखळी उपोषणाला भेट देऊन, सहभागी होणे गरजेचे आहे. तसेच येणाऱ्या 27 तारखेच्या महाशांती रॅली मध्ये सहभागी होणं ही सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे.   ज्या पद्धतीने विनाचार्य भंतेजीनी कल्याण बुद्धभूमी या ठिकाणी या आंदोलनाबाबत जी दिशा दिलेली आहे त्या पद्धतीने आपण ही आपली विरासत सांभाळणं, त्याचे संगोपन करणं आपले कर्तव्य आहे.   सदर आंदोलन सफल करण्यासाठी एक-एक बौद्ध बंधू भगिनी व विहार कमिटी-संघटना-संस्था, जयंती कमिटी यांनी दान पारमिता संपादन करावे. दान देऊन क्रीन शॉट अजंठा बुद्ध विहार (व्हाट्सअप ग्रुप) किंवा 98195 87898 या नंबर वर पाठवावे.निधी व्यवस्थापनेसाठी प्रकाश कांबळे, सुहास बनसोडे, अनिल कुरणे या तिघांचे निधी व्यवस्थापन उप-कमिटी तयार करण्यात आलेली आहे. सर्व प्रबुध्द नागरिकांचे एकच ध्येय, महाबोधि महाविहार करायचे आहे मुक्त. अभी नहीं तो कभी नही ! असे आवाहन बोधगया महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन समिती- ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत सरकार उदासीन   
बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बिहार सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या आंदोलनात उपोषणकत्यांना जबरदस्ती उचलून रुग्णालयात दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, उपचारानंतर जेव्हा भदंत आणि इतर कार्यकर्ते पुन्हा आंदोलनस्थळी परतले, तेव्हा बिहार सरकारने आंदोलनस्थळ सील करून तिये बसण्यास मज्जाव केला. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या लोकशाही मागनि सुरू असलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जिल्हाधिकारी पूर्णत उपेक्षा करत आहेत. मुख्यमंत्री वारंवार महाबोधी विहारास भेट देतात, मात्र उपोषणकर्त्यांची साधी भेट घेण्याची तसदीही त्यांनी घेतलेली नाही, जिल्हाधिका-यांनी देखील "माझ्याकडे यासंबंधी कोणतेही निवेदन आलेले नाही" असे सांगत वेळ मारून नेली आहे.  बिहारामध्ये दलित समाज आहे, मात्र बौद्ध समाज तुलनेने कमी असल्याने या आंदोलनाला स्थानिक स्तरावर पुरेशी धार येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक आणि आंबेडकरी चळवळीने हे आंदोलन हाती घेणे गरजेचे आहे,  या आंदोलनाने आता महाराष्ट्रात मोठे रूप धारण केले आहे. औरंगाबाद, नागपूर, पुणे, परभणी, मुंबई, आदी ठिकाणी यासंदर्भात आंदोलन, मेळावे आणि जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.  महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून बौद्ध बांधवांनी बिहारला जाऊन या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा, "बुद्धगया मुक्त होईपर्यंत हा लढा थांबणार नाही! आंबेडकरी चळवळीशी संबंधित तमाम संघटनांनी, सामाजिक कार्यकत्यांनी आणि बौद्ध उपासक उपासिकांनी या ऐतिहासिक लढ्याला समर्थन द्यावे आणि मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये उपस्थित राहावे, हा लढा बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचा आहे आणि त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्राने आता पुढाकार घ्यावा, -  -   भदंत विशुद्धानंदबोधि, महाथेरो (बोधगया बिहार)   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com