ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
ऊमराळे येथील नवीन नागरी प्राथमिक आरोग्यकेंद्र सर्वसामान्यांकरिता खूले
September 25, 2020 • JANATA xPRESS

ऊमराळे येथील नवीन नागरी प्राथमिक आरोग्यकेंद्र सर्वसामान्यांकरिता खूले

वसई

नगरसेवक डाॅ प्रविण क्षिरसागर,ह्यांच्या सहकार्याने व सहकारी नगरसेवक मार्शल लोपीस व अजित नाईक यांनी पश्चिम पट्ट्यासाठी तीन वर्षापुर्वी आरोग्य केंद्राची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अखेर दिनांक २३ सप्टेंबर रोजी युवा आमदार क्षितीज ठाकूर ह्यांनी ऊमराळे व आजूबाजूस रहाणाऱ्या साठी ऊमराळे येथील नवीन नागरी प्राथमिक आरोग्यकेंद्र सर्वसामान्यांकरिता खूले करून दिले  यासाठी परिसरातील नागरिकांनी लोकनेते लोकनेते हितेंद्र ठाकूर (आप्पा)यांचे आभार मानले. याकरिता महापौर प्रविण शेट्टी, स्थाई समिती सभापती प्रशांत राऊत,  सभापती पंकज ठाकूर , सभापती महाडिक, सर्व नगरसेवक,  नगरसेविका तसेच आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच आपल्या वॅार्ड मधील कोणीही करोनामुळे खूप जास्त serious असल्यास आणि आवश्यक ती औषधे किंवा इंजेक्शन खूप प्रयत्न करून उपलब्ध होत नसल्यास तुमच्या परिसरातील आपल्या  ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधा ते तुम्हाला त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करतील असे आवाहन बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
१) वसई:- प्रविण शेट्टी, लॅारेन डायस, नारायण मानकर, भरत गुप्ता, उमा पाटील. २) नालासोपारा:- रुपेश जाधव, निलेश देशमुख,  अतुल साळुंखे. ३) हायवे परिसर:- बेटा भोईर, रमेश घोरकना. ४) 🟡विरार:-  काशिनाथ पाटील, जितूभाई शहा, पंकज ठाकूर, अजीव पाटील, महेश पाटील,  प्रशांत राऊत, यज्ञेश्वर पाटील, सखाराम महाडिक,   हार्दिक राऊत व आपल्या परिसरातील अन्य ज्येष्ठ  नेते मंडळी.