ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
ऑनलाईन शाळा रद्द करण्याची मागणी 
June 30, 2020 • JANATA xPRESS
ऑनलाईन शाळा रद्द करण्याची चिरंजीवी संघटनेची मागणी 
 
 
ठाणे
         
पंधरा जून पासून महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा घेण्याचा जो काही निर्णय घेतला आहे त्याला चिरंजीवी संघटनेने विरोध करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली  ई-मेल च्या माध्यमातून शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा चिरंजीवी संघटना  " घरोघरी घंटानाद "आंदोलन करणार असल्याची घोषणा संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी दिली. ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय हा सर्वसमावेशक नाही आहे त्यामध्ये बरीच मूळ या शिक्षणातुन मुकली गेली आहे हा निर्णय रद्द करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात यावा असे अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी सांगितले 
       या कोरोनाच्या भयंकर काळात जिथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने वाढत आहे,अनेक घरांमध्ये एक वेळच्या जेवणासाठी देखील धान्य नाही,अनेक गावांमध्ये वीज नाही,पाणी नाही अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप अशी उपकरणे कुठून येणार  हा साधा विचार सरकार ने केला नाही का ? असा प्रश्न संघटनेचे राज्यकार्यवाह राहुल भाट यांनी विचारला. अनेक विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये देखील कोरोना चे रुग्ण आहेत,अनेकांना कॉरंटाईन केलेलं आहे आधीच लहान मूल या वातावरणात घाबरले असताना ते ऑनलाईन सत्र अटेंड करु शकणार नाहीत आणि शाळेतून ऑनलाईन शाळा अटेंड करण्याच्या दबावामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या राज्यसंघटक वैष्णवी ताम्हणकर यांनी सांगितले.
      ऑनलाईन सत्र अटेंड करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं असता शिक्षक शिकवतात हे आम्हाला कळत नाही,खूप विद्यार्थी असल्याने प्रश्न विचारता येत नाहीत असे उत्तर दिले असल्याचे संघटनेचे राज्यसचिव चेतन कांबळे यांनी सांगितले.
        जव्हार मोखाडा येथील शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळा अटेंड करत अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.या काळात जे घर फक्त आणि फक्त लोकांच्या येणाऱ्या धान्याच्या मदतीने जगत आहे अश्या घरातील हा मुलगा अतिशय हुशार आहे.आपण नापास होऊ नये या भीतीने तो घरच्यांकडे मोबाईल चा हट्ट करत आहे.ही केवळ एकच घटना आहे अशा अनेक घटना गावागावांमध्ये घडत असाव्यात ही माहिती संघटनेचे राज्यप्रवक्ता राहुल बनसोडे यांनी दिली.