ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
कोरोना रुग्णात होणाऱी वाढ पाहता ठामपाची पुन्हा लॉकडाऊनची तयारी
June 28, 2020 • JANATA xPRESS

कोरोना रुग्णात होणाऱी वाढ पाहता ठामपाची लॉकडाऊनची तयारी

ठाणे

मागील तीन दिवसात सुमारे एक हजार रुग्णांची वाढ झाली आहे. ठामपा हद्दीतील माजिवडा -मानपाडा , कळवा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, नौपाडा -कोपरी, मुंब्रा आणि दिवा या ग्रामीण भागात देखील कोरोनाने जोर पकडला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे काही नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन करत नाहीत. अनेकजण विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस देखील हतबल झाले आहे.  परिणामी ठाणे शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  महापालिका प्रशासनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य ती खबरदारी  घेण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने शहरात पुन्हा लॉकडाऊन  करण्याबाबत पोलीस प्रशासनाबरोबर बैठक घेऊन सोमवारपासून पुढील १० ते१५  दिवस शहरात लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करणार आहेत. रुग्णसंख्या  झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असून त्याबाबत ठाणे महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील असे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.