ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
कोविड -१९ नंतरची जागतिक आर्थिक परिस्थिती : संभाव्य बदल विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषद
May 31, 2020 • JANATA exPRESS

Post Covid-19 Economic Scenario of the World - Projected Changes विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषद

मुंबई

ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीतर्फे International Online Conferenceचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार,8 जून पासून  संध्याकाळी 5.00 ते 7.30  या कालावधीत ही परिषद घेण्यात येईल.  या International Online Conference-चा विषय कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमिला अनुसरून  "Post Covid-19 Economic Scenario of the World - Projected Changes" असा घेण्यात आला आहे. या Conference-मध्ये विविध विषयातील तज्ञ सामील होणार आहेत.
  1 ) डाॅ.नरेंद्र जाधव
  2 ) सिद्धार्थ राझदान,दुबई
  3 ) अब्दुल देवाले मोहमद,जागतिक अर्थ परिषद,नायजेरिया व युनायटेड किंगडम्
  4 ) अनिता सचदेव,कॅनडा व हिंदुस्तान
  5 ) व्यंकटेश कुलकर्णी,सेंद्रीय शेती,हिंदुस्तान
  6 ) दिमुथू तेन्नाकून,प्रमुख कार्यकारी अधिकारी,श्रीलंकन एअरलाईन्स,कोलंबो, श्रीलंका
  7 ) अजित रानडे,अर्थतज्ञ,आदित्य बिड्ला संस्था समूह
  8 ) रिचर्ड राॅथमन,माजी वाणिज्य अधिकारी,यू.एस्.ए.काॅन्सुलेट जनरल
  9 ) बलदेव सिंग विजन,खनिज तेल तज्ञ
10 ) लुतफोर रेहमान,उपराजदूत, बांगला देश  उपदुतावास,मुंबई

ह्या International Online Conference-चे सूत्रचालन प्रख्यात अर्थतज्ञ पत्रकार उदय निर्गुडकर करणार आहेत.

ह्या International Online Conference-च्या आयोजनाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा दिला आहे. तसेच स्टार महाराष्ट्र या मराठी  साप्ताहिकाने प्रसिद्धीची जबाबदारी घेतली आहे. या Conference-मध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे,त्यांना रुपये ५०० शुल्क चेंबरकडे भरायचे आहे.परदेशी स्थायिक व्यक्तींनी $ 10.00 भरायचे आहेत.त्याचा तपशील लवकरच सांगितला जाईल. अशी माहिती  ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे प्रवर्तक व सचिव संजय भिडे यांनी दिली.

20 ते 30 मे  या कालावधित ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्री व माॅरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला International Internship Programme यशस्वीरीत्या संपन्न झाला. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या शिक्षण समितीची मुख्या प्राध्यापिका डाॅ. वैशाली वाढे यांनी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्री व माॅरिशस विद्यापीठ यांच्यामध्ये घडवून आणलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने या पहिला संयुक्त प्रकल्प कोरोनाव्हायरसच्या लाॅकडाऊन कालखंडात यशस्वीरीत्या पार पडला. एकशे नव्वद माॅरिशसचे विद्यार्थी आणि सत्तर हिंदुस्तानी विद्यार्थी अशा दोनशे साठ विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. माॅरिशस विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डाॅ.धंजय झ्युरी यांनी दिलेल्या निःसंदिग्ध पाठिंब्यामुळेच डाॅ.वैशाली वाढे यांना हा संयुक्त प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास पाठबळ मिळाले होते.