ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
कोव्हीड-१९ ची माहिती आता एक क्लीकवर
May 8, 2020 • JANATA exPRESS

नॉन कोव्हीड मृत व्यक्तींच्या मृतदेहावर कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत

तर कोव्हीड बाधित मृतदेहावर थेट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची नियमावली

ठाणेकरांना मिळणार कोव्हीड 19 ची माहिती आता एक क्लीकवर
डिजी ठाणे प्लॅटफॅार्मच्या माध्यमातून नवा उपक्रम



ठाणे

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 ची प्रभाग समिती निहाय माहिती आता डिजी ठाणे प्लॅटफॅार्मच्या माध्यमातून आता क्लीकवर ठाणेकरांना उपलब्ध होवू शकणार आहे. या मध्ये बाधित रुग्णांची संख्या, वयोगटानुसार आकडेवारी, कंटेन्टमेंट प्लॅन आदीची अद्ययावत माहिती आता डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीने  http://essentials.thanecity.gov.in/ या डॅशबॉर्डवर सर्व माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

     राज्यात सर्वत्र कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे शहरात महापालिकेच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.शहरातील नागरिकांना घरबसल्या कोरोना कोव्हीड 19 बाबतची माहिती मिळावी यासाठी डिजी ठाणेच्यावतीने एक विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर प्रभाग समिती निहाय कोरोना कोव्हीड 19 रुग्णांची माहिती, तारीख मुदतीनुसार कोव्हीड 19 रुग्णांची माहिती, संख्या, वयोगटानुसार पॉझिटिव्ह रुग्ण, कंटेन्टमेंट प्लॅन, सामुदायिक पातळीवरील टीएमसीचा पुढाकार आदी या सर्व बाबींची अद्ययावत माहिती पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी ठाणे महापालिकेची कोरोना कोव्हीड 19 ची अद्ययावत माहिती पाहण्यासाठी http://essentials.thanecity.gov.in या लिंकवर भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

नॉन कोव्हीड मृत व्यक्तींच्या मृतदेहावर कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत

तर कोव्हीड बाधित मृतदेहावर थेट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची नियमावली

 शहरातील हॉस्पिटलमध्ये नॉन कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेस जमा होणाऱ्या जवळच्या आप्तेष्टनातेवाईक व त्यांची मित्रमंडळी यांना कोविड-१९ चा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीचा मृतदेह घरी न पाठविता थेट स्मशानभूमीत पाठवून कमीत कमी लोंकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याबाबतचे तसेच कोव्हीड बाधित मृत व्यक्तींच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करीत थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून तशी नियमावली शहरातील सर्व रूग्णालय प्रशासनाला पाठविण्यात आली आहे.
      
काही दिवसांपूर्वी कोविड-१९ संशयित व्यक्तीचारुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अशा व्यक्तीच्यारुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतांना शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता विल्हेवाट लावल्याचे निर्दर्शनास आलेले आहेसदर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचारुग्णाचा कोविड - १९ चा नमुना अहवाल पॉझिटीव्ह म्हणून प्राप्त झालेला आहेयामुळे संबंधित मृत रुग्ण व्यक्तीच्या अंत्ययात्रेस जमा झालेले त्यांचे जवळचे आप्तेष्टनातेवाईक व मित्रमंडळी या सर्वांना कोविड -१९ ची लागण होऊन त्यांच्या जीवाला धोका संभवतोया पार्श्वभूमीवर कोविड - १९ ची लागण होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रूग्णाचा मृतदेह घरी न पाठविता कमीत कमी लोंकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत. 

     त्याचबरोबर केंद्र शासनाचे कोव्हीड-१९ संशयितपाँझीटीव्ह रुग्णांचा मृतदेह हाताळण्याबाबत दिशा निर्देश आहेतकोविड - १९ संशयित अथवा पॉझिटीव रुग्णांचा मृतदेह हाताळतांना मानांकित संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियांचे पालन करावेयामध्ये हात धुणेपीपीई किट वापरणे व मृत शरीरास लागलेल्या सर्व वस्तूंचे निर्जतृकाकरण करणेमृत शरीराच्या बाहेरील बाजूस १टक्के हायपोक्लोराईटने निजतुकीकरण करुन शरीरास कोणतेही छिद्र नसलेल्या प्लास्टिक बॅाडीबॅगमध्ये ठेवणेमृतदेह बॉडीबॅगमध्ये बंद केल्यानंतर सदरची बॉडीबॅग कोणत्याही परिस्थितीत उघडण्यात येऊ नयेसदर मृतदेह थेट शवागार किंवा स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे नेऊन त्याचा पीपाई किट घातलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत दाहसंस्कार अथवा दफन करावेत्यानंतर सदर मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे निर्जतूकीकरण करून सर्व कचरा जैविक कचरा समजून त्याची जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट नियमावली नुसार विल्हेवाट लावावीअशा पद्धतीने कोविड-१९ संशयितपॉझीटीव्ह रुग्णाचे मृतदेह हाताळणेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
     
कन्फर्म नॉन कोव्हीड 19 व्यक्ती मृत झाली व संबंधित मृतदेहाचे अंत्यसंस्कार नेहमीप्रमाणे करताना अंत्ययात्रेस उपस्थित असलेल्या आप्तेष्टनातेवाईकमित्रमंडळी यापैकी एक व्यक्ती कोव्हीड 19 बाबत संशयित किंवा पॉझिटीव्ह असेल तर उपस्थितांमध्ये कोव्हीड 19 चा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीअंत्ययात्रेस जे आप्तेष्टनातेवाईकमित्रमंडळी उपस्थित होते त्यांना सदरचा धोका टाळण्याच्या दृष्टीने हा निंर्णय घेण्यात आला आहे.