ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
चीनच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंची निदर्शने
June 21, 2020 • JANATA xPRESS

चीनने भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंची निदर्शने

कल्याण

 चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ऍप टीकटॉकवर भारतात बंदी आणावी व महाराष्ट्र्र  सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला  करार रद्द करावी,भारतात १५ करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीन ला कोट्यावधींचा फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीनच्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी या मागणी साठी व चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात २० भारतीय शूर जवान शहीद झालेत्या चीन ने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या  निषेधार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशाने रिपाइंचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथे निदर्शने करण्यात आले.
यावेळी रिपाइं कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मीनाताई साळवे, सहकार आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण पठारे, ठाणे प्रदेशचे नरेंद्र मोरे, रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन कल्याण भिवंडी अध्यक्ष राहुल कांबळे, रिपब्लिकन चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष विलास गायकवाड इत्यादीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.