ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
छोट्या वृत्तपत्रांना मदत करण्यास आपण राज्य सरकारला सांगू - राज्यपाल
October 16, 2020 • JANATA xPRESS

छोट्या वृत्तपत्रांना मदत करण्यास आपण राज्य सरकारला सांगू - राज्यपाल

मुंबई

छोट्या वृत्तपत्रांना मदत करण्यास आपण राज्य सरकारला सांगू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दिले. संपादक व पत्रकार सेवा संघाचे प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  राजभवनावर राज्यपालांची भेट घेउन छोट्या वृत्तपत्रांच्या समस्या मांडल्या. त्यावेळी राज्यपालांनी आश्वासन दिले. या शिष्टमंडळात संस्थेचे  विश्वस्त व मंत्रालय फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, डॉ. सिध्दार्थ पाटील, एम.एस.शेख, नंदकिशोर धोत्रे आदि उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.  

कोरोना संकट काळात ग्रामीण भागातील छोट्या वृत्तपत्रांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र राज्य शासनाकडून जाहिरात स्वरुपात व इतर फारसे सहकार्य होत नसल्याची बाब यावेळी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. प्रारंभी जयपाल पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष किसन भाउ हासे, उपाध्यक्ष नरेंद्र लचके यांच्याकडून राज्यातील संपादक व पत्रकारांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांना दिली.