ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
टोरंट हटाव मोहिम तीव्र करण्यासाठी आंदोलनास पाठिंबा द्या - भगत
May 28, 2020 • JANATA exPRESS

टोरंट हटाव मोहिम तीव्र करण्यासाठी आंदोलनास पाठिंबा द्या - भगत

ठाणे.

कळवा मुंब्रा दिवा शिळ दहिसर विभागातील नागरिकांनी आपल्या विभागात टोरंट कंपनीचे कामगार व अधिकारी आपल्या विभागात महावितरणनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधां नष्ठ करुन नवीन केबलसह अनेक सिस्टीम बदलुन विजग्राहकांना भिवंडी सारखे त्रास देण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्यात वारंवार विजपुरवठा खंडीत करुन ग्राहकानी त्यांच्या कामाची दखल घ्यावी व त्यांच्या कार्यालयाचे यावे म्ह्णुन हा त्यांचा खटाटोप असतो.म्ह्णुन त्यांच्या या कृत्याचा सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचे आवाहन टोरंट हटाव मोहिमेचे प्रमुख गोविंद भगत यांनी केले आहे. 

त्यासाठी कृपया कोणीही टोरंट चे ऑनलाइन किंव्हा विज भरणा केंद्रावर जाऊन बिल भरु नयेत.तसेच त्यांचे  मीटर ही घेऊ नयेत.असे असह्कार आंदोलन सुरू करावे.त्याने सरकार ही ठिकाण्यावर येईल. आज टोरंटच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, शिळ, देसई, दहिसर विभागातील जनता हैरान झाली आहे. म्ह्णुन त्यानी एकत्रित येवुन टोरंट विरोधी  लॉकडाऊन मध्ये सुरु होणारया आंदोलनास पाठींबा देऊन टोरंट विरोधी आपला आवाज बुलंद करावा. आंदोलनाची घोषणा लवकरच करण्यात येईल.असेही भगत यांनी स्पष्ट केले.

टोरंट विरोधातील आंदोलन लॉकडाऊन मुले दि.14.4.2020 पासुन  स्थगित केलेले आहे, सरकार व सर्व राजकारणी लॉकडाऊन लवकर उठवतील अशी लक्षणे नजीकच्या भविष्यकाळात दिसत नाहीत. कारण 22 मार्च जनता कर्फ्यु व 24 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसाचा लॉकडाउन पाळुन ते 14 एप्रिलला उठवणार होते, तसे झाले नाही नंतर,3 मे व 17 मे आणि आता 31 मे तारखेवर तारीख पडत जाणार आणि लॉकडाऊन वाढत जाणार,  रोजच्यारोज करोना बाधितांची संख्या वाढतच जाणार आहे. असे करुन करोना व्हायरस हटवण्याची योजना 2024 पर्यंत सुरु ठेवण्याची व्यवस्था राजकारणी करत आहेत असे एकंदरीत वाटते.कारण देशात 30 जानेवारीला एक करोनाग्रस्त रुग्ण होता. 5 मार्चला 30, 15 मार्च 114,तर लॉकडाउन नंतर 25 मार्चला 657 रुग्ण होतात व पुढे संख्या चारपट्ट वाढत जाते कारण पॉजिटिव्ह व निगेटिव्ह एकत्र ठेऊन सरकार आकडे वाढवतच आहे.कसे पहा 31 मार्च 1397, 5 एप्रिल 4289, 10 एप्रिल 7600, 20 एप्रिल 18539, 30 एप्रिल 34863, 6 मे 49400,19 मे 101139, 25 मे 150050 रुग्ण झालेत.याचाच अर्थ  लॉकडाउन म्हणजे करोना रुग्ण वाढवण्याची सोपी राजकीय पध्दत देशात वापरली जात आहे. लॉकडाउन उठविने म्हणजे रुग्ण वाढविण्याची कारखाना/फैंक्ट्रि बंद करण्यासारखे होईल असा आरोपही त्यांनी केला.