ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
 धनगर महासंघातर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर
February 18, 2020 • प्रजासत्ताक जनता

 धनगर महासंघातर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर


ठाणे  
कल्याण येथील पीसवली मधील मंगलमूर्ती बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र चिकित्सा शिबिराला कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपमहापौर मोरेश्वर भोईर,भा ज पा चिटणीस भरत जाधव, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर परदेशी,धनगर समाज संघर्ष समिती,नवी मुंबई अध्यक्ष संदीप पांढरे,उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष महेंद्र परदेशी आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
या शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला यामध्ये 400 लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर 150 लोकांना अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे रमेश परदेशी,रवींद्र परदेशी,आण्णासाहेब पवार,संदेश परदेशी,राहुल परदेशी,शैलेश  परदेशी,सुरेश परदेशी,,डॉ वानखेडे,डॉ डी आर बोरकर,मंगलमूर्ती कमिटीचे सदस्य,संजीवनी हुमान वेलफेयर सोसायटीचे पदाधिकारी आदीने परिश्रम घेतले