ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
धर्म कोड ७ मधे नमूद करा आपला धर्म आदिवासी
May 1, 2020 • JANATA exPRESS • Article : साहित्य
आपला धर्म आदिवासी  
 
 
               डॉ.विकास आमटे, प्रकाश आमटे, राणी बंग, गोदूभाई परुळेकर मंच, विवेक पंडित, मेघाताई पाटकर हे अनेक ब्राम्हण लोक आदिवासी समाजासाठी भरीव कार्य करीत आहेत,त्यांचे काही आदिवासी बांधव पटकन ऐकतात. त्याच्या सारखे ब्राम्हण धर्जिणी अनेक लोक महाराष्ट्रात देशात असतील आणि ते ब्राम्हण आहेत,जवळ जवळ हे ब्राम्हण लोक आदिवासीच्या जीवावर जगत आहेत असे म्हटल्यास जास्त वावगे ठरणार नाही आणि आता भारतभर जनगणना होणार आहे आणि एकीकडे आदिवासी धर्म कोड सात मधे लिहून आपला धर्म आदिवासी लिहावा आपण हिंदु नाहीत आपला धर्म हिंदू नाही ,
 
आपला धर्म आदिवासी आहे ,धर्म कोड ७मधे नमूद करा अशी जनजागृती केली जात असताना आदिवासींच्या जीवावर जगणारी बांडगुळ गप का बसली आहेत.हे या आदिवासी समाज बांधवांना तुमचा धर्म आदिवासी आहे असे का सांगत नाहीत?हजारोंच्या संख्येने मोर्चे चे नेतृत्व एक ब्राम्हण कुटुंबीय करीत आहेत आणि भोले- भाबडे आदिवासी समाज बांधवांना त्यांच्यावरच विश्वास आहे तर अशी ब्राम्हण मंडळी जी आदिवासींच्या जीवावर जगत आहे तर ते आज या आदिवासी समाजाला आदिवासी धर्म लिहा आदिवासी धर्म कोड ७ आहे असेच लिहा.असे का सांगत नाहीत,
 
आदिवासींना वनवासी संबोधून वनवासी करण करून आदिवासी नष्ट करण्याचा भूमी केला हे आदिवासी साठी कार्य काम करणारा ब्राम्हण वर्ग हा एक प्रकारे हात भारच लावत आहे कारण आज पर्यंत  ना ब्राम्हणाने जाहीर केले ना आदिवासी कार्य करणाऱ्या ब्राम्हण धर्मिणी नेत्याने केला,का करीत नाही हे आदिवासींचे मसिहा समजणारे बिगर आदिवासी लोक आज भारत भर लहान मोठ्या आदिवासी संघ,संघटना, मंडळे आदिवासी समाज बांधवांना जागृत करून आपला धर्म आदिवासी आपला धर्म कोड ७ आहे चुकूनही हिंदू लिहू नका असा प्रचार प्रसार करीत असताना बिगर आदिवासी,आदिवासी समाजासाठी कार्य करणारी ,ब्राम्हण मंडळी आदिवासी बांधवांना का सांगत नाहीत की तुमचा धर्म हा हिंदू नाही तर आदिवासी आहे धर्म कोड 7(७) आहे.
 
मोहन बारकु जानकीबाई गुहे