ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
पडघ्यातील किशोर माने  MPSC उत्तीर्ण ; मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी म्हणुन नियुक्ती
July 18, 2020 • JANATA xPRESS
पडघ्यातील किशोर माने  MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी म्हणुन नियुक्ती
 
ठाणे 
 
 
भिवंडी
तालुक्यातील  पडघा, बाळाजीनगर येथिल   किशोर माने  MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयात उपसहाय्यक अधिकारी म्हणुन त्यांची  नियुक्ती झाली आहे.  पडघा विभागातून   प्रथमच MPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचा बहुमान शिक्षक  कुटुंबातील  किशोर विलास माने यांना मिळाला आहे.  बी. एस.सी.,पी.यू.डी., एम. एस. सी., एम. ए.,एल. एल. बी.असे शिक्षण प्राप्त केले असून  अभ्यासात अत्यंत मेहनत घेऊन किशोर माने यांनी  हे यश प्राप्त केले आहे .  MPSC उत्तीर्ण व्हायची ही त्यांची जिद्द गेल्या पाच वर्षापासून होती आणि ती जिद्द कठोर परीश्रमाने आज किशोर माने यांनी  खरी करून दाखवली आहे. म्हणून  पडघा विभागातून व विविध विभागातून   किशोर माने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
काही दिवस मी कंपनी मध्ये काम करीत होतो. काम करत असतांनाच एका बाजूला  गेल्या ५ वर्षापासून माझा अभ्यास सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरीत होवून, त्यांचा आदर्श  डोळ्यासमोर होता. आपले प्रामाणिक प्रयत्न असतील तर थोडं उशिरा  पण  आपण आपले स्वप्न साकार करू शकतो. असे मत किशोर माने यांनी व्यक्त केले.