ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
पाकव्याप्त जम्मू / काश्मीर आणि लडाख वैद्यकीय संस्थाना भारतात मान्यता नाही
August 13, 2020 • JANATA xPRESS

पाकव्याप्त जम्मू / काश्मीर आणि लडाख वैद्यकीय संस्थाना भारतात मान्यता नाही

नवी दिल्ली

जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हा संपूर्ण भाग भारताचाच अभिन्न भाग आहे. मात्र पाकिस्तानचा या प्रदेशाच्या काही भागांवर ताबा आहे. म्हणून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील कोणत्याही वैद्यकीय संस्थेला आयएमसी अॅक्ट, १९५६ अंतर्गत अनुमती घेणे आवश्यक आहे, असे नोटीस भारतीय वैद्यकीय परिषदेने जारी केली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी देखील ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. पाकव्याप्त भागातील वैद्यकीय संस्थामधील वैद्यकीय पदव्या अधिकृत समजल्या जाणार नाहीत, आणि येथील पदवीधरांना भारतात कोठेही आपला वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी भारतीय वैद्यकीय परिषदेची या संदर्भातील नोटीस ट्विट केली आहे.

आता ज्या लोकांकडे पाकव्याप्त काश्मीर आणि लडाख (पीओजेकेएल) येथील वैद्यकीय पदवी आहे, अशा लोकांना भारतात वैद्यकीय सेवा देता येणार नाही.  याबाबत भारतीय वैद्यकीय परिषदेच्या मार्फत (MCI) एक परिपत्रक जारी  करण्यात आले आहे. पाकिस्तानने अनधिकृतपणे कब्जा केलेल्या या भागातील मेडिकल कॉलेजमधील पदव्या मान्य नाहीत असे एमसीआयने नोटीशीत स्पष्ट केले आहे. अशा लोकांना भारतात रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे एमसीआयने म्हटले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू आणि काश्मीर आणि लडाख क्षेत्रातील कोणत्याही मेडिकल इन्स्टीट्यूटला अगोदर भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ अंतर्गत अनुमती आणि मान्यता घेणे आवश्यक असल्याचे परिषदेने म्हटले आहे.