ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
पोषण आहारात अपहार, अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले  
September 13, 2020 • JANATA xPRESS

पोषण आहारात अपहार करताना अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले  
महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई ; मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
प्रशासकीय कारवाई करण्याचे ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश

ठाणे
अंगणवाडी मार्फत सहावर्षाखालील बालक, स्तनदा माता, गरोदर माता यांना पूरक पोषण आहार वाटप केला जातो. कोव्हिडच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुका पोषण आहार वाटप करण्यात येत होता. अंगणवाडीतील बालकांना वाटप केला जाणारा सुका पोषण आहाराचे पॅकेट टेम्पोतून विक्रीसाठी घेऊन जाताना कल्याण तालुका एकात्मिक विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका ( सुपरवायझर ) सुषमा घुगे यांना निळजे हद्दीत सापळा रचून पकडण्यात आले. मसूर, चणा, तेल, गहू, तांदूळ, मीठ, हळद, आदि पदार्थांची पाकिट यामध्ये होती. सुमारे ५९ हजार ८१३ इतक्या किमतीचा पकडण्यात आलेला हा मुद्देमाल आहे. 

मानपाडा पोलिस ठाण्यामध्ये भादवी कलम 409 आणि 420 प्रमाणे पकडण्यात आलेल्यावर गुन्हे दाखल करण्यात आला. 59 हजार 813 रकमेचा मुद्देमाल जप्त करत शनिवारी उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. संबधित पर्यवेक्षिकीवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. संबधित पर्यवेक्षिका अपहार करत असल्याची माहिती प्राप्त झाल्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या आदेशांनुसार महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे, बालाजी कोरे यांच्या साथीने शनिवारी मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. चौरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डांबरे यांच्या टिमच्या सहकार्यने सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी प्रशासनास सहकार्य केले.

घडलेल्या प्रकारात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मी दिलॆ आहेत. यापुढे देखील असाप्रकारे गैरकाम करण्यावर कडक कारवाई केली जाईल. - 
---- हिरालाल सोनवणे (भा.प्र.से)  मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, ठाणे  

  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने कारवाई  करण्यात आली. या विभागाचा विभाग प्रमुख या नात्याने पुढील काळात असे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जाईल. दोषींवर कारवाई झालेली आहेच. या घटनेतून इतरांना देखील वचक बसेल. 
 --- संतोष भोसले   महिला व बाल विकास अधिकारी