ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
बिना सहकार नाही उद्धार.....
June 12, 2020 • JANATA exPRESS • Your Advertise : जाहिरात

नमस्कार....

Covide-19 अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाचीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाच्या या अजस्त्र लाटेचा फटका सर्वच संस्था, व्यवसायांना बसला पण या कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक वाहून गेली ती पत्रकार मंडळी. सातत्याने समाजाच्या अन्याय, अत्याचारावर आसूड ओढणाऱ्या लेखनीला म्यान करत, पोटासाठी चहा विक, सॅनिटायझर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काही पत्रकारांनी तर डबे बनव, सिक्युरिटी गार्डची नोकरी हे पर्याय पण स्वीकारले आहेत. महाराष्ट्रातील नावाजलेल्या संपादक, वृत्त संपादक, बातमीदार, पेजमेकर, जाहिरात विभागातील तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. महाराष्ट्रात हजारो पत्रकार बेकार झालेत. पत्रकार आहे म्हणून अन्य संस्था त्यांना नोकरी देतांना हात आखडता घेतात. त्यामुळे सर्वाधिक घुसमट या क्षेत्राची होत आहे. एका मोठ्या संकटातून हा वर्ग जातोय. पण कुणालाही ना सोयर ना सुतक. पत्रकारांची एक पिढीच या कोरोनाने उध्वस्त केली आहे. त्यामुळे या पत्रकारांना मोलाचा हात देण्याची गरज आहे. वर्तमानपत्र बंद झाल्यामुळे त्यावर निर्भर असणारे देखील आर्थिक जंजाळात सापडले आहेत. तरीही आपली पत्रकारिता आणि समाजसेवेचे व्रत अंगिकारणारे सोशल मिडीयाद्वारे आपले कार्य इमानेइतबारे करत आहेत. मात्र त्यानाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन गरजा अर्थात नेटवर्ककरिता लागणारे चार्जेस, संगणकावर काम करणारे ऑपरेटर्स, बातम्या बनवून देणारे बातमीदार अशी काही मंडळी आजही कार्यरत आहेतच. मात्र त्यांनाही कुटुंब असल्याने त्याच्यासाठी काही तजवीज करणे गरजेचे आहे.  या गोष्टींची पुर्तता करण्याकरिता आपल्यासारख्या व्यक्तींच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपणही सामाजिक बांधिलकी स्विकारून यासाठी  सहकार्य करावे ही अपेक्षा.

     व्यवस्थापक  
 प्रजासत्ताक जनता  

 

A/c NAME :             SHAKYARATN ENTERPRESES

BANK NAME :          THANE BHARAT SAHAKARI BANK LTD

IFCSC CODE NO. :   TBSB0000006

ACCOUNT NO. :        006110000001103