ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
मनपा संचालित dispensaries तात्काळ सुरू करण्याची धारावी पुनर्विकास समितीची मागणी
April 9, 2020 • प्रजासत्ताक जनता

धारावीतील सर्व Health Post, मनपा संचालित dispensaries तात्काळ सुरू करण्यात याव्या

धारावी पुनर्विकास समितीची मागणी


मुंबई

धारावीतील कोविड-१९ संसर्गग्रस्त झालेल्या रुग्णांची वाढती संख्या ही अत्यंत गंभीर आणि काळजी वाढवणारी गोष्ट असून . धारावीतील सर्व Health Post, मनपा संचालित dispensaries ज्या आजमितीस बंद आहेत, त्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात.तसेच  हेल्थ पोस्टच्या पॅरा मेडिकल स्टाफला प्रशिक्षित करून, धारावीतील घरोघरी जावून कोविड - १९ ची टेस्ट करण्याची व्यवस्था करावी. मागणी  बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना  धारावी पुनर्विकास समितीचे राजू कोरडे आणि अनिल शिवराम कासारे यांनी केली आहे. 

आपल्या मागणी पत्रात त्यांनी पुढे  धारावीतील सर्व खाजगी दवाखाने (dispensaries) तात्काळ  सुरू करणे, RMP doctors ना अनिवार्य करावे. असे न करता सेवा देण्यापासून पळ काढणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.  धारावीतील पर राज्यातील मजुरांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशांना शासनाच्या वतीने पुरविणे आवश्यक असलेले मोफत अन्न - धान्याचे वितरण तात्काळ सुरू करावे.. धारावीतील ५१ बेड्सचे ' साई हॉस्पिटल ' पालिकेने ताब्यात घेतले आहे, त्याचप्रमाणे धारावीतील पालिकेचे "Urban Health Center" ची इमारत ताब्यात घेऊन ती वापरात आणावी. धारावीपासून जवळच असलेले शीव येथील ' शेठ र. व. आयुर्वेद रुग्णालय ' सुद्धा ताब्यात घेता येऊ शकते. तसेच धारावी परिसरातील रहेजा, हिंदुजा, मेहता, लिलावती आदी विश्वस्त न्यासांच्या रुग्णालयातील काही बेड्स ताब्यात घेण्यात यावीत.. धारावीतील सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांकडून पैसे आकारणे बंद केल्यामुळे, अनेक शौचालय चालकांनी शौचालये बंद केली आहेत वा पाणी - वीज खंडित केली आहे. अशी सर्व शौचालये ताब्यात घेऊन या संकट समयी मोफत सेवा पुरविण्यास तयार असलेल्या संस्थांना ती देण्यात यावीत. शौचालयात जाताना व परतताना हात धुण्याकरिता पाणी - साबण किंवा sanitizer ची उपलब्धता ठेवावी.   शौचाकरिता, किराणा घेणेकरिता तसेच औषधोपचाराकरिता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये, असे निर्देश द्यावेत. ( धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही, याची कृपया नोंद घ्यावी)
त्याच प्रमाणे. धारावीतील उच्च घनता (साधारणतः १ लाख घरे, बहुतांश दुमजली. अंदाजे  लोकसंख्या १५ लाख) तसेच सरासरी १०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरात राहणारे किमान ६ ते ८ जणांचे कुटुंब ही परिस्थिती लक्षात घेता घरातही social distancing पाळणे शक्य नाही. ही लोकं काहीकारणे बाहेर येतीलच. ती त्यांची अपरिहार्यता आहे. ही बाब लक्षात घेवून धारावी संपूर्णतया सिल करण्याचे खूळ डोक्यातून काढून टाकावे.असे आवाहनही समितीने केले आहे.