ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
युनायटेड वे मुंबईच्या वतीने पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप 
June 17, 2020 • JANATA xPRESS

युनायटेड वे मुंबईच्या वतीने पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप 

कल्याण 

युनायटेड वे मुंबई या सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रातील पाच ते सहा कॉर्पोरेट कंपन्यांच्या मदतीने कोरोनाच्या पादुर्भावात सामाजिक भान राखून  मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आदी शहरातील विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या गरजूंना व गोर गरीब, मध्यम वर्गीयांना महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू असलेल्या अन्न धान्याचे किटची मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे कल्याण मधील पत्रकारांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. युनायटेड वे या सेवा भावी संस्थेचे डायरेक्टर अजय गोवले यांच्या मार्गदर्शनाखाली  व्यवस्थापक  मनश्री मंत्री व रवींद्र आरवेल यांच्या नेतृत्वा खाली संस्थेच्या पदाधिकारी मोनिका गुरसिंघानी  यांच्या   उपस्थितीत कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात कल्याण मधील विविध वृत्तपत्रातील सुमारे ५२ पत्रकारांना संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान सामाजिक बांधिलकी बाळगून कोरोना महामारीत केलेल्या मदती बद्दल कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे आणि इतर सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले आहेत.